Dhurandhar: भल्याभल्यांना पाणी पाजणारा 'धुरंधर'! १२ दिवसांतच ५०० कोटींकडे वाटचाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 15:01 IST2025-12-17T15:01:23+5:302025-12-17T15:01:42+5:30
पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत 'धुरंधर'चे शो हाऊसफूल आहेत. या १२ दिवसांत सिनेमाने छप्परफाड कमाई केली आहे. 'धुरंधर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.

Dhurandhar: भल्याभल्यांना पाणी पाजणारा 'धुरंधर'! १२ दिवसांतच ५०० कोटींकडे वाटचाल
Dhurandhar:जिकडे तिकडे 'धुरंधर' या अॅक्शन स्पाय थ्रिलर सिनेमाची चर्चा आहे. रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमातून पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या भारतीय गुप्तहेरांच्या गुप्त कारवायांची कहाणी दाखवण्यात आली आहे. पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत 'धुरंधर'चे शो हाऊसफूल आहेत. या १२ दिवसांत सिनेमाने छप्परफाड कमाई केली आहे. 'धुरंधर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
'धुरंधर' सिनेमाची पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर चलती आहे. या सिनेमाने अख्खं मार्केटच खाऊन टाकलं आहे. पहिल्याच आठवड्यात 'धुरंधर'ने २०७ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर दुसऱ्या वीकेंडला सिनेमाने तब्बल १११ कोटींची कमाई केली. त्यानंतरही 'धुरंधर' थांबलेला नाही. या आठवड्यातही सोमवरी आणि मंगळवारी अंदाजे ३० कोटींचा बिजनेस या सिनेमाने केला आहे. आत्तापर्यंत 'धुरंधर'ने १२ दिवसांत ४११ कोटींची कमाई केली आहे. तर ५०० कोटींच्या दिशेने या सिनेमाची वाटचाल सुरू आहे.
रणवीर सिंग, आर माधवन, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन अशी 'धुरंधर' सिनेमाची स्टारकास्ट आहे. आदित्य धरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. लवकरच हा सिनेमा ओटीटीवरही प्रदर्शित होणार आहे. तब्बल १५० कोटींना 'धुरंधर'च्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाचं ओटीटी डील झाल्याची माहिती आहे.