सारा अर्जुनसह 'धुरंधर'मधील 'या' अभिनेत्याला मिळालं सर्वात कमी मानधन, दुसऱ्या भागात ठरणार गेमचेंजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 18:08 IST2026-03-11T17:56:11+5:302026-03-11T18:08:32+5:30
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटातील तगडी स्टारकास्ट आणि त्यांच्या अभिनयाचे कौतुक होत असतानाच आता या कलाकारांनी या चित्रपटासाठी किती मानधन घेतले, याचे आकडे समोर आले आहेत.

सारा अर्जुनसह 'धुरंधर'मधील 'या' अभिनेत्याला मिळालं सर्वात कमी मानधन, दुसऱ्या भागात ठरणार गेमचेंजर
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटातील तगडी स्टारकास्ट आणि त्यांच्या अभिनयाचे कौतुक होत असतानाच आता या कलाकारांनी या चित्रपटासाठी किती मानधन घेतले, याचे आकडे समोर आले आहेत. यात सर्वाधिक चर्चा होत आहे ती म्हणजे अभिनेता अर्जुन रामपालच्या मानधनाची. अर्जुन रामपालला सर्वात कमी मानधन मिळाल्याचं बोललं जातंय.
अर्जुन रामपालचे मानधन
चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणाऱ्या अर्जुन रामपालला इतर मोठ्या कलाकारांच्या तुलनेत खूपच कमी मानधन मिळाल्याचे समजते. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटासाठी अर्जुन रामपालला फक्त १ कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे. चित्रपटातील त्याची भूमिका प्रभावी असली तरी, मानधनाचा हा आकडा थक्क करणारा आहे.
इतर कलाकारांनी किती मानधन घेतले?
१. रणवीर सिंग: चित्रपटाचा मुख्य नायक असलेल्या रणवीरने सर्वाधिक मानधन घेतले आहे. त्याला या भूमिकेसाठी सुमारे ३० ते ५० कोटी रुपये मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
२. संजय दत्त : 'संजू बाबा'ने या चित्रपटासाठी जवळपास १० कोटी रुपये फी घेतली असून तो रणवीरनंतर दुसरा सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार ठरला आहे.
३. आर. माधवन: महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या माधवनला अंदाजे ९ कोटी रुपये मानधन मिळाले आहे.
४. अक्षय खन्ना: आपल्या अभिनयाने छाप पाडणाऱ्या अक्षय खन्नाला साधारण २.५ ते ३ कोटी रुपये मिळाले आहेत.
५. सारा अर्जुन: या नवोदित अभिनेत्रीला देखील तिच्या भूमिकेसाठी १ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
'धुरंधर' हा चित्रपट सुमारे २५० ते २८० कोटी रुपयांच्या भव्य बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. चित्रपटातील ॲक्शन सीन्स आणि कलाकारांच्या मानधनावर मोठा खर्च करण्यात आला आहे. सध्या या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच 'धुरंधर २'ची देखील प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. 'धुरंधर २' सिनेमा १९ मार्च २०२६ ला रिलीज होणार आहे.