न्यूयॉर्कमध्ये रणवीर-दीपिकाने भारतीय पदार्थांवर मारला ताव; शेफने सांगितली 'धुरंधर' अभिनेत्याची आवडती डिश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 14:03 IST2026-01-13T14:01:44+5:302026-01-13T14:03:57+5:30
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण न्यूयॉर्कला गेले होते. तिथेही त्यांनी भारतीय पदार्थांवर ताव मारला आणि आवडती डिश कोणती हेही सांगितलं

न्यूयॉर्कमध्ये रणवीर-दीपिकाने भारतीय पदार्थांवर मारला ताव; शेफने सांगितली 'धुरंधर' अभिनेत्याची आवडती डिश
बॉलिवूडमधील सर्वांचं लाडकं जोडपं म्हणजे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग. हे दोघेही सध्या त्यांच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आहेत. नुकताच या जोडीचा न्यूयॉर्कमधील एका रेस्टॉरंटमधील 'रोमँटिक डिनर डेट'चा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नवीन वर्षाचे स्वागत आणि रणवीरच्या 'धुरंधर' चित्रपटाचे यश साजरं करण्यासाठी हे जोडपं सध्या परदेशात वेळ घालवत आहे.
न्यूयॉर्कमधील एका प्रसिद्ध मिशेलिन-स्टार रेस्टॉरंटमध्ये हे दोघे डिनरसाठी गेले होते. यावेळी त्यांनी रेस्टॉरंटचे शेफ मयंक इस्तवाल यांच्यासोबत खास पोझ दिली. विशेष म्हणजे, या डिनर डेटसाठी दीपिका आणि रणवीरने एकमेकांना मॅचिंग असे काळ्या रंगाच्या कपडे परिधान केले होते. ज्यामुळे त्यांचे फोटो अधिकच लक्षवेधी ठरले आहेत. या रेस्टॉरंटच्या शेफने या जोडीच्या आवडीच्या पदार्थांविषयी देखील माहिती दिली असून, न्यूयॉर्कमध्ये असूनही या दोघांनी भारतीय चवीच्या खास पदार्थांचा आस्वाद घेतल्याचे सांगितले.
रणवीर - दीपिकाने या रेस्टॉरंटमध्ये मयंकने बनवलेल्या 'दाल मखनी'चा आस्वाद घेतला. मयंकने बनवलेली दाल मखनी प्रसिद्ध असल्याने रणवीर-दीपिकानेही आवर्जून दाल मखनी खाल्ली. त्यामुळेच न्यूयॉर्कमध्ये आल्यावर त्यांनी त्यांची आवडती दाल मखनी खाल्ली. याशिवाय इतर भारतीय पदार्थांवरही ताव मारला. यापूर्वी त्यांनी प्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांच्या 'बंगलो' रेस्टॉरंटलाही भेट दिली होती, जिथे दीपिकाने स्वतः मोदक बनवण्याचा आनंद लुटला होता.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, रणवीर सिंग सध्या त्याच्या 'धुरंधर' चित्रपटाच्या ऐतिहासिक यशाचा आनंद घेत आहे, ज्याने बॉक्स ऑफिसवर १००० कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर दुसरीकडे, दीपिका पादुकोण लवकरच शाहरुख खानसोबत 'किंग' या चित्रपटात आणि दिग्दर्शक एटली यांच्या आगामी साय-फाय चित्रपटात दिसणार आहे.