Dhurandhar 2: ट्रेलरमध्ये झलक दिसली पण सिनेमात 'रहमान डकैत' पाहायला मिळणार का? समोर आली मोठी अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 16:15 IST2026-03-09T16:13:48+5:302026-03-09T16:15:23+5:30
रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'धुरंधर २' (Dhurandhar 2) सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या चित्रपटाच्या टीझर आणि गाण्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली असतानाच, अभिनेता अक्षय खन्ना 'धुरंधर २' या चित्रपटात दिसणार की नाही? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Dhurandhar 2: ट्रेलरमध्ये झलक दिसली पण सिनेमात 'रहमान डकैत' पाहायला मिळणार का? समोर आली मोठी अपडेट
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'धुरंधर २' (Dhurandhar 2) सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या चित्रपटाच्या टीझर आणि गाण्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली असतानाच, अभिनेता अक्षय खन्ना 'धुरंधर २' या चित्रपटात दिसणार की नाही? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अक्षय खन्नाच्या 'रहमान डकैत' या भूमिकेची छोटीशी झलक ट्रेलरमध्ये दिसली. पण सिनेमात रहमान डकैत पुन्हा पाहायला मिळणार का, जाणून घ्या
रणवीर सिंगच्या 'धुरंधर' चित्रपटातील अक्षय खन्नाने साकारलेला 'रहमान डकैत' हा खलनायक प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला आहे. पहिल्या भागात रहमानचा खून झाल्याचं दिसलं, त्यामुळे 'धुरंधर २' मध्ये अक्षय खन्ना दिसणार नाही, असे अनेक चाहत्यांना वाटत होते. मात्र, आता समोर आलेल्या नवीन माहितीनुसार, अक्षय खन्ना या चित्रपटात पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय खन्ना या वेळी पहिल्या भागाप्रमाणे मुख्य खलनायकाच्या भूमिकेत नसेल, तरीही चित्रपटातील काही महत्त्वाच्या 'फ्लॅशबॅक' दृश्यांमध्ये त्याने साकारलेल्या रहमान डकैतची झलक पाहायला मिळणार आहे. कथेतील काही जुन्या रहस्यांचा उलगडा करण्यासाठी निर्माते अक्षय खन्नाला पुन्हा दाखवतील, अशी शक्यता आहे. जरी ही भूमिका छोटी असली, तरी ती कथेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
'धुरंधर २' या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धर करत असून, यामध्ये रणवीर सिंगसोबत संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांसारखे दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे कथानक अत्यंत भव्य असून त्यात अनेक सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. 'धुरंधर २' हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. रणवीर सिंगच्या अॅक्शनचा नवा अवतार पाहण्यासाठी चाहते आता सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.