रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'मध्ये विकी कौशलची एन्ट्री, पुन्हा दिसणार लष्कर अधिकाऱ्याच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 10:16 IST2026-01-21T10:15:03+5:302026-01-21T10:16:09+5:30
'धुरंधर २'बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. रणवीर सिंगच्या या सिनेमात बॉलिवूड अभिनेता विकी कौशलची एन्ट्री होणार आहे.

रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'मध्ये विकी कौशलची एन्ट्री, पुन्हा दिसणार लष्कर अधिकाऱ्याच्या भूमिकेत
आदित्य धरच्या 'धुरंधर' सिनेमाची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. 'धुरंधर'नंतर आता 'धुरंधर २'ची सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमाच्या सीक्वलसाठी चाहते उत्सुक असून येत्या मार्च महिन्यात 'धुरंधर २' प्रदर्शित केला जाणार आहे. या सीक्वलचं नाव 'धुरंधर २ - द रिवेंज' असं असणार आहे. आता 'धुरंधर २'बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. रणवीर सिंगच्या या सिनेमात बॉलिवूड अभिनेता विकी कौशलची एन्ट्री होणार आहे.
मिड डेने दिलेल्या रिपोर्टनुसार 'धुरंधर २'मध्ये विकी कौशल कैमिओ करताना दिसणार आहे. या सिनेमात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. 'धुरंधर २'मध्ये विकी कौशल मेजर विहान शेरगिल ही भूमिका साकारणार आहे. रणवीर सिंग, अक्षय खन्ना, आर माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'धुरंधर २'मध्ये आता विकी कौशलची एन्ट्री होणार असल्याने चाहते खूश झाले आहेत. पण, या सिनेमात अक्षय खन्ना काही फ्लॅशबॅक सीन्समध्ये दिसून येईल.
'धुरंधर २' हा सिनेमा येत्या १९ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. गेल्या वर्षी ५ डिसेंबरला 'धुरंधर' प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमाने आत्तापर्यंत जगभरात १२०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. आता 'धुरंधर २' बॉक्स ऑफिसवर पहिल्या भागासारखाच धुमाकूळ घालणार का, हे पाहावं लागेल.