'धुरंधर'च्या दुसऱ्या पार्टचं टायटल काय असणार माहितीये का? सेन्सॉर बोर्डाने दिलं 'ए' सर्टिफिकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 10:27 IST2026-01-20T10:25:28+5:302026-01-20T10:27:28+5:30

'धुरंधर'चा पुढच्या पार्टची उत्सुकता, सिनेमाचं नाव आलं समोर

dhurandhar 2 title will be dhurandhar the revenge censor board gave a certificate movie directed by aditya dhar | 'धुरंधर'च्या दुसऱ्या पार्टचं टायटल काय असणार माहितीये का? सेन्सॉर बोर्डाने दिलं 'ए' सर्टिफिकेट

'धुरंधर'च्या दुसऱ्या पार्टचं टायटल काय असणार माहितीये का? सेन्सॉर बोर्डाने दिलं 'ए' सर्टिफिकेट

५ डिसेंबर रोजी रिलीज झालेला 'धुरंधर' सिनेमा ४६ दिवसांनंतरही टिकून आहे. सिनेमाने प्रेक्षकांवर भुरळच घातली आहे. अनेकांनी सिनेमा दोन वेळा अगदी तीन वेळाही पाहिला. शिवाय याचा दुसरा पार्टही येणार आहे. १९ मार्च रोजी 'धुरंधर २' रिलीज होईल. या पुढच्या पार्टसाठी चाहते उत्सुक आहेत.  आता सिनेमाच्या टायटलविषयी माहिती समोर आली आहे. सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला सर्टिफिकेटही दिलं आहे.

'बॉलिवूड हंगामा'  रिपोर्टनुसार, 'धुरंधर २' चं अधिकृत टायटल 'धुरंधर : द रिवेंज' असं असणार आहे. १९ जानेवारी रोजी सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन(CBFC) ने सिनेमाच्या टीझरला हिरवा झेंडा दाखवला आहे. 'धुरंधर: द रिवेंज'चा टीझर १ मिनिटांपेक्षा जास्त लांबीचा आहे. सोबतच सिनेमाला ए सर्टिफिकेट देण्यात आलं आहे. सिनेमाचा टीझर 'बॉर्डर २'च्या वेळी पहिल्यांदा दाखवण्यात येणार आहे. 

सनी देओल, वरुण धवनचा 'बॉर्डर २' देशभक्तीपर सिनेमा आहे. याचाच फायदा घेत धुरंधल: द रिवेंजचं टीझरही 'बॉर्डर २'च्या वेळी दाखवण्याची मेकर्सची स्ट्रॅटेजी आहे. 'धुरंधर'च्या शेवटी दाखवण्यात आलेल्या क्रेडिट नोटमधूनच नवा टीझर बनवण्यात आला आहे. बॉर्डर २ वेळी टीझर रिलीज केल्यानंतर तो इतर डिजीटल प्लॅटफॉर्म्सवर रिलीज केला जाईल. 

'धुरंधर'मध्ये अक्षय खन्ना म्हणजेच रहमान डकैतचा मृत्यू होता.  आता 'धुरंधर द रिवेंज'मध्येही अक्षय खन्ना दिसणार असल्याची चर्चा आहे. तर रणवीर सिंहची यामध्ये फ्लॅशबॅक कहाणी असू शकते. तसंच अर्जुन रामपालला दुसऱ्या पार्टमध्ये मोठी भूमिका असेल असा अंदाज आहे. 'धुरंधर'ने भारतात ८२६.५० कोटींचा व्यवसाय केला. तर जगभरात सिनेमाने तब्बल १२८३.५ कोटींची कमाई केली.

Web Title : 'धुरंधर 2' का शीर्षक खुलासा: 'द रिवेंज,' मिला 'ए' सर्टिफिकेट

Web Summary : 'धुरंधर' का सीक्वल, जिसका शीर्षक 'धुरंधर: द रिवेंज' है, को 'ए' सर्टिफिकेट मिला है। टीज़र 'बॉर्डर 2' के साथ शुरू होगा। अक्षय खन्ना फिर से दिख सकते हैं; अर्जुन रामपाल की महत्वपूर्ण भूमिका होने की उम्मीद है। मूल फिल्म ने भारत में ₹826.50 करोड़ और दुनिया भर में ₹1283.5 करोड़ कमाए।

Web Title : 'Dhurandhar 2' Title Revealed: 'The Revenge,' Gets 'A' Certificate

Web Summary : Dhurandhar's sequel, titled 'Dhurandhar: The Revenge,' has received an 'A' certificate. The teaser will debut with 'Border 2'. Akshay Khanna may reappear; Arjun Rampal is expected to have a significant role. The original earned ₹826.50 crore in India and ₹1283.5 crore worldwide.