Dhurandhar 2: सेन्सॉरने 'धुरंधर २'ला दिलं हे सर्टिफिकेट! १६ वर्षांवरील मुलांना बघता येणार की नाही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 14:57 IST2026-02-19T14:55:14+5:302026-02-19T14:57:58+5:30
'धुरंधर'च्या पहिल्या पार्टपेक्षा दुसरा पार्ट छोटा की मोठा?

Dhurandhar 2: सेन्सॉरने 'धुरंधर २'ला दिलं हे सर्टिफिकेट! १६ वर्षांवरील मुलांना बघता येणार की नाही?
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाच्या दुसऱ्या भागाची सर्वांना प्रतीक्षा आहे. १९ मार्च रोजी 'धुरंधर: द रिव्हेंज' रिलीज होणार आहे. पहिला भाग तब्बल साडेतीन तासांचा होता. तर आता दुसरा भाग तेवढाच मोठा असणार का यावर अपडेट आलं आहे. पार्ट २ ला सेन्सॉरकडून सर्टिफिकेटही मिळालं आहे. तसंच सिनेमा किती तासांचा असेल हेही समोर आले आहे. धुरंधर २ पार्ट १ पेक्षा कमी असणार का? वाचा
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
'धुरंधर २: द रिव्हेंज'ला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच सेन्सॉर बोर्डाने क्लिअरन्स दिलं आहे. धुरंधर पार्ट १ हा ३ तास ३५ मिनिटांचा होता. तर आता दुसरा पार्ट थोडा छोटा असणार आहे. सीबीएफसी वेबसाईटनुसार, धुरंधर २ ला युए १६ प्लस सर्टिफिकेट मिळालं आहे. ९ फेब्रुवारी रोजीच सिनेमाला सर्टिफिकेशन प्राप्त झालं. सिनेमाचं रनटाईम २०८ मिनिटांचं आहे. म्हणजेच सिनेमा ३ तास २८ मिनिटांचा असेल. पार्ट १ मध्ये ४ मिनिटांचा तर पोस्ट क्रेडिट सीनच होता. त्यामुळे दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा सहा-सात मिनीट छोटा आहे.
१९ मार्च रोजी 'धुरंधर: द रिव्हेंज' आणि यशचा 'टॉक्झिक'ही रिलीज होणार आहे. याचा अर्थ रणवीर सिंह आणि यश यांच्यात बॉक्स ऑफिसवर क्लॅश होणार आहे. दोन्ही सिनेमांमध्ये तगडे अॅक्शन सीन्स बघायला मिळणार आहेत. 'धुरंधर'च्या पहिल्या भागाला तुफान यश मिळालं त्यामुळे दुसऱ्या पार्टचंही पारडं जड असणार आहे. तर दुसरीकडे यशचे चाहतेही 'टॉक्झिक' पाहण्यासाठी आतुर आहेत. सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून सर्वत्र त्याचीच चर्चा आहे.
'धुरंधर:द रिव्हेंज'मध्ये यामी गौतम दिसणार असल्याची चर्चा आहे. सिनेमात रणवीर सिंहची भूमिका असलेल्या हमजा अलीची बॅकग्राऊंड स्टोरी पाहायला मिळणार आहे. तसंच बडे साहब नक्की कोण यावरूनही पडदा उठणार आहे. हा पार्ट २ आणखी इंटेन्स असणार आहे.