Dhurandhar 2: शूटिंग करताना कोसळला 'धुरंधर' अभिनेता, रणवीर सिंगने लगेच मदत केली, नाहीतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 11:22 IST2026-03-18T11:15:15+5:302026-03-18T11:22:43+5:30

'धुरंधर २' अधिकृतरित्या उद्या १९ मार्चला रिलीज होणार आहे. परंतु आजपासून काही ठिकाणी 'धुरंधर २'चे प्रीव्ह्यू शो पाहायला मिळणार आहेत. अशातच सिनेमासंदर्भातला एक खास किस्सा समोर आला आहे

Dhurandhar 2 actor vikram bhambri collapsed while shooting Ranveer Singh helped | Dhurandhar 2: शूटिंग करताना कोसळला 'धुरंधर' अभिनेता, रणवीर सिंगने लगेच मदत केली, नाहीतर...

Dhurandhar 2: शूटिंग करताना कोसळला 'धुरंधर' अभिनेता, रणवीर सिंगने लगेच मदत केली, नाहीतर...

'धुरंधर २' अधिकृतरित्या उद्या १९ मार्चला रिलीज होणार आहे. परंतु आजपासून काही ठिकाणी 'धुरंधर २'चे प्रीव्ह्यू शो पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे सर्वांना 'धुरंधर २' पाहण्याची उत्सुकता आहे. अॅडव्हान्स बुकींगमध्येच 'धुरंधर २' सिनेमा हाउसफुल्ल झाला आहे. अशातच या सिनेमातील एका अभिनेत्याने रणवीर सिंगबद्दल भावुक करणारा किस्सा सांगितला. मी अचानक कोसळल्यावर सेटवर रणवीरने माझी कशी मदत केली, याचा खुलासा या अभिनेत्याने केलाय.

अभिनेता विक्रम भांबरी लवकरच 'धुरंधर २' मध्ये झळकणार आहे. विक्रमने IANS ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "शूटिंग सुरू असताना माझ्या पायाला दुखापत झाली होती, पण कोणालाही काही न सांगता मी शूटिंग सुरुच ठेवलं. मात्र, नंतर जेव्हा मी असह्य वेदनेमुळे जमिनीवर कोसळलो, तेव्हा मला पाहून रणवीर माझ्या दिशेने धावत आला.''

''त्याने मला उचललं आणि तो म्हणू लागला की, 'मला ठाऊक आहे यात खूप वेदना होतात, कारण माझ्या पत्नीलाही अशाच प्रकारचं दुखणं सहन करावं लागलं होतं. शूटिंग दरम्यान तिनेही कोणाला काहीच सांगितले नव्हते.' त्याच क्षणी मला जाणीव झाली की तो दीपिकाबद्दल बोलत आहे. त्यानंतर रणवीर स्वतः मला प्रथमोपचार केंद्रात (First Aid Center) घेऊन गेला."

'धुरंधर-२' मधील दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना विक्रम पुढे म्हणाला, ''"या अनुभवी कलाकारांसोबत काम करणे नेहमीच प्रेरणादायी असते. त्यांना अभिनय करताना पाहणे म्हणजे एखाद्या 'मास्टरक्लास'मध्ये सहभागी होण्यासारखे आहे. कधीकधी ते किती सहजतेने एखाद्या दृश्यात जीव ओततात, हे पाहून आम्ही थक्क व्हायचो. त्यांची सेटवरील उपस्थिती ऊर्जा एका वेगळ्याच उंचीवर असते. हे सर्व पाहून एक कलाकार म्हणून तुम्ही अधिक चांगले बनता." 

Web Title : धुरंधर 2: अभिनेता शूटिंग के दौरान गिरा, रणवीर सिंह ने तुरंत मदद की

Web Summary : 'धुरंधर 2' की शूटिंग के दौरान अभिनेता विक्रम भांबरी पैर में चोट लगने से गिर गए। रणवीर सिंह ने तुरंत मदद की, दीपिका के समान अनुभव को साझा किया और प्राथमिक उपचार प्रदान किया। भांबरी ने कलाकारों की प्रेरणादायक व्यावसायिकता की सराहना की।

Web Title : Dhurandhar 2: Actor Collapses, Ranveer Singh's Swift Aid Saves the Day

Web Summary : During 'Dhurandhar 2' shoot, actor Vikram Bhambri collapsed due to a leg injury. Ranveer Singh rushed to help, sharing his wife Deepika's similar experience and providing first aid. Bhambri praised the cast's inspiring professionalism.