धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 09:43 IST2025-11-26T09:41:11+5:302025-11-26T09:43:54+5:30
धर्मेंद्र यांचं नुकतंच निधन झालं. अशातच धर्मेंद्र यांच्या महत्वांकाक्षी सिनेमाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. धर्मेंद्र यांचा हा सिनेमा आता कधीच बनणार नाही.

धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ते आता आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी आणि चित्रपट चाहत्यांच्या मनात कायम घर करून राहतील. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर आता त्यांच्या एका मोठ्या आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
धर्मेंद्र, त्यांचे दोन्ही मुलगे सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यासह 'अपने २' या चित्रपटाच्या सिक्वलची तयारी करत होते. २००७ मध्ये आलेल्या सुपरहिट 'अपने' या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाचा हा सिक्वेल होता, ज्याची चाहते अनेक वर्षांपासून वाट पाहत होते.
दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी दिली माहिती
'अपने' आणि 'अपने २' च्या सिक्वेलचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी आता या चित्रपटाच्या भवितव्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर 'अपने २' या चित्रपटाचं शूटिंग आता पुढे ढकलण्यात येणार नाही तर या सिनेमाची तयारी आता बंद करण्यात येणार आहे.
This Iconic Scene from Apne🎬
— Rahul Gupta (@RahulGupta25376) November 12, 2025
When Sunny Deol, in front of the media, fights the boxer to protect his father #Dharmendra
That moment shows a son’s unconditional love #SunnyDeol can fight anyone for his father Dharmendra’s pride
Truly one of the most emotional films ever made💔 pic.twitter.com/T7mkWF6z6v
रिपोर्टनुसार, दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सांगितले की, "धर्मेंद्रजींशिवाय 'अपने' चित्रपटाचा सिक्वेल बनवणे शक्यच नाही. 'अपने'च्या मूळ कलाकारांशिवाय 'अपने २' आता बनणं शक्य नाही. धरमजींशिवाय सिक्वेल बनवणं मुळीच शक्य नाही."
अनिल शर्मा यांनी सांगितलं की, 'अपने २' ची स्क्रिप्ट तयार होती आणि सर्व गोष्टी मार्गी लागल्या होत्या. या सिक्वेलमध्ये देओल कुटुंबातील तीन पिढ्या दिसणार होत्या - धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल आणि सनीचा मुलगा करण देओल हे एकत्र काम करणार होते. मात्र काही स्वप्नं नेहमीच अपूर्ण राहतात," असं सांगून अनिल शर्मा यांनी हा मोठा चित्रपट बंद करण्याची घोषणा केली आहे. धर्मेंद्र यांचा अखेरचा चित्रपट 'इक्कीस' २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.