'सर्वच अभिनेते मला मुलासारखे पण सलमान खान...' भाईजानबद्दल धर्मेंद्र यांचं विधान चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 14:10 IST2023-09-04T14:09:58+5:302023-09-04T14:10:42+5:30
या पिढीतील सर्वच अभिनेते मला माझ्या मुलासारखेच आहेत. माझं सगळ्यांवर प्रेम आहे. पण सलमान खान वेगळा आहे.

'सर्वच अभिनेते मला मुलासारखे पण सलमान खान...' भाईजानबद्दल धर्मेंद्र यांचं विधान चर्चेत
बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र (Dharmendra) सध्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमामुळे चर्चेत आहेत. शिवाय त्यांचा मुलगा सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' सुपरहिट ठरला आहे. 'गदर 2'च्या यशानिमित्त सनी देओलने सक्सेस पार्टीचं आयोजन केलं होतं. यासाठी संपूर्ण बॉलिवूड एकत्र आलं. विशेष म्हणजे तीनही खान सलमान, शाहरुख आणि आमिर एकत्र आले. धर्मेंद्र यांनी सलमान खानबाबत (Salman Khan) केलेले एक जुने वक्तव्य आता व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये धर्मेंद्र म्हणाले, 'तसं पाहिलं तर या पिढीतील सर्वच अभिनेते मला माझ्या मुलासारखेच आहेत. माझं सगळ्यांवर प्रेम आहे. पण सलमान खान वेगळा आहे. तो मला माझ्यासारखाच वाटतो. कारण ७०-८० च्या दशकातील माझं आयुष्य त्याच्या आताच्या आयुष्याशी खूप मिळतं जुळतं आहे. मला सलमान अगदी माझ्यासारखाच वाटतो.'
ते पुढे म्हणाले, 'इंडस्ट्रीत आमची ओळख अशी झाली आहे की आम्ही थोडं काही बोललो तरी त्याचा मसाला बनवत आमच्याच विरोधात वापरलं जातं. तेच इतर लोकांना खून जरी केला तरी त्याची काहीच चर्चा होत नाही. माझं आणि सलमान खानचं आयुष्य बऱ्याच अंशी मिळतंजुळतं आहे. मी ज्याप्रकारे आयुष्यात अनेक संकटांचा आणि अडचणींचा सामना केला आहे तसाच सामना सलमान खाननेही केला आहे.'
सलमान खानच्या आगामी 'टायगर 3' चं पोस्टर रिलीज झालं आहे. यामध्ये सलमान आणि कॅटरिनाचा जबरदस्त लुक दिसत आहे. चाहते सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.