थकलेला चेहरा अन् पायाला फ्रॅक्चर; धर्मेंद्र यांच्या नवीन पोस्टने चाहते चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 12:08 IST2024-03-01T12:04:00+5:302024-03-01T12:08:39+5:30

धर्मेंद्र यांनी मध्यरात्री केलेल्या पोस्टने चाहत्यांना काळजी वाटली आहे. काय आहे धर्मेंद्र यांची नवीन पोस्ट?

dharmendra new social media post worried by his fans | थकलेला चेहरा अन् पायाला फ्रॅक्चर; धर्मेंद्र यांच्या नवीन पोस्टने चाहते चिंतेत

थकलेला चेहरा अन् पायाला फ्रॅक्चर; धर्मेंद्र यांच्या नवीन पोस्टने चाहते चिंतेत

बॉलिवूडमधले दिग्गज ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) हे सोशल मीडियावर चर्चेत असतात. धर्मेंद्र हे सध्या मनोरंजन विश्वात चांगले सक्रीय आहेत. २०२३ मध्ये आलेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात धर्मेंद्र यांनी साकारलेली भूमिका चांगलीच गाजली. याशिवाय २०२४ मध्ये आलेल्याा 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' सिनेमात धर्मेंद्र यांनी शाहिद कपूरच्या आजोबांची भूमिका साकारली. धर्मेंद्र सध्या सोशल मीडियावर सुद्धा चांगलेच चर्चेत असतात. अशातच धर्मेंद्र यांनी केलेली नवीन पोस्ट वाचून चाहत्यांना चिंता लागून राहिली आहे.

धर्मेंद्र यांनी आज शुक्रवारी पहाटे ३ वाजून ५२ मिनिटांनी एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये धर्मेंद्र यांचा चेहरा थकलेला दिसत असून त्यांच्या पायावर प्लास्टर लागलेलं दिसतंय. "अर्धी रात्र झालीय.. झोप येत नाहीय.. भूक लागतेय.. मित्रांनो शिळी रोटी लोणीसोबत खुप चविष्ट लागते." धर्मेंद्रच्या या फोटोखाली फॅनने कमेंट करुन लिहीलंय की, "सर तुमच्या पायाला काय झालंय." त्यावर धर्मेंद्र यांनी उत्तर दिलंय की.. "माझा घोटा फ्रॅक्चर झालाय.. तुम्हा सर्वांचा आशिर्वादाने लवकरच तंदुरुस्त होईल."

 

धर्मेंद्र यांनी मध्यरात्री केलेली ही पोस्ट वाचून चाहते चिंतेत आहेत. धर्मेंद्र यांचा थकलेला चेहरा आणि त्यांच्या पायाला लागलेलं प्लास्टर बघून चाहत्यांना काळजी वाटली असून त्यांनी कमेंटमध्ये ती व्यक्त केलीय. काही वेळानंतर धर्मेंद्र यांनी केलेली पोस्ट डीलीट केली. धर्मेंद्र लवकरच बॉबी देओल आणि सनी देओल या त्यांच्या मुलांसोबत 'अपने 2' सिनेमात झळकणार आहेत.

Web Title: dharmendra new social media post worried by his fans