यालाच प्रेम म्हणतात! आजही हेमा मालिनींसाठी धर्मेंद्र करतात 'ही' गोष्ट, लेक ईशाने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 16:14 IST2025-09-25T16:08:12+5:302025-09-25T16:14:30+5:30
हेमा मालिनींसाठी धर्मेंद्र या आवडत्या गोष्टीचा त्याग करतात. त्यामुळे धर्मेंद्र यांचं हेमा मालिनींवर जीवापाड प्रेम असलेलं दिसतं

यालाच प्रेम म्हणतात! आजही हेमा मालिनींसाठी धर्मेंद्र करतात 'ही' गोष्ट, लेक ईशाने केला खुलासा
प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचं खऱ्या आयुष्यात हेमा मालिनींसोबतलग्न झालंय. धर्मेंद्र आणि हेमा मालिनींची प्रेमकहाणी आजही बॉलिवूडमध्ये आवर्जुन सांगितली जाते. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारं जोडपं म्हणून धर्मेंद्र आणि हेमा मालिनींकडे बघितलं जातं. अशातच या दोघांची मुलगी ईशा देओलने धर्मेंद्र यांच्या खास सवयीचा उल्लेख केला. आजही हेमा मालिनींवरील प्रेमासाठी धर्मेंद्र एक कृती करताना दिसतात. काय आहे ती गोष्ट? जाणून घ्या
हेमावरील प्रेमासाठी धर्मेंद्र करतात ही गोष्ट
ईशा देओलने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिचे वडील धर्मेंद्र हे पक्के नॉन व्हेजिटेरियन आहेत. धर्मेंद्र यांना चिकन, मटण खाण्याची आवड आहे. तरीही ते पत्नी हेमा मालिनी यांच्या आवडीचा खूप आदर करतात. त्यामुळे हेमा मालिनी आणि धर्मेंद्र जेव्हा एकत्र असतात, तेव्हा धर्मेंद्र हे मांसाहार करत नाहीत. हेमा यांच्यावरील प्रेमासाठी ते त्यावेळी शाकाहारी बनतात आणि हेमा यांच्यासमोर नॉन-व्हेज खाणं पूर्णपणे टाळतात.
ईशाने पुढे सांगितले की, जेव्हा ते दोघे बाहेर प्रवासाला जातात, तेव्हा धर्मेंद्र कधीकधी मांसाहार करतात. पण जेव्हा त्यांना मांसाहार खाण्याची इच्छा होते तेव्हा ते दुसऱ्या खोलीत जाऊन खातात. कारण हेमा यांना मांसाहाराचा वासही सहन होत नाही.
धर्मेंद्र पंजाबी कुटुंबातील असले तरी, ईशा देओलचा जन्म आणि तिची वाढ ही आई हेमा मालिनी यांच्या दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीत झाली आहे. ईशाने सांगितले की, ती घरी इडली, सांबार, डोसा-चटणी आणि दही-भात खाऊन मोठी झाली आहे. तिला हे पदार्थ खूप आवडतात. तसेच, तिच्या मुली राध्या आणि मिराया यांनीही आता हेच पदार्थ खायला सुरुवात केली आहे. ईशाने सांगितलं की, तिची आई हेमा आता ग्लूटन-फ्री (Gluten-free) आहार घेतात. बेकरी पदार्थ, मैदा, अंडी, मांस असे अनेक पदार्थ त्या खाणं टाळतात.