धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 09:55 IST2025-11-12T09:54:37+5:302025-11-12T09:55:01+5:30

धर्मेंद्र यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर गर्दी

Dharmendra discharged from hospital Sunny Deol s team issued a statement actor will be treated at home | धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."

धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."

जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना आज सकाळीच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णवाहिकेतून धर्मेंद्र यांना घरी नेण्यात आले. यावेळी धाकटा मुलगा बॉबी देओल त्यांच्यासोबत होता. धर्मेंद्र यांच्यावर आता घरीच उपचार होणार आहेत अशी माहिती सनी देओलच्या टीमने अधिकृत स्टेटमेंट जारी करत दिली आहे. धर्मेंद्र यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने चाहते खूश झाले आहेत. तसंच त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहे.

धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा अभिनेता सनी देओलच्या टीमने अधिकृत स्टेटमेंट दिले आहे. यात नमूद करण्यात आले आहे की, "मिस्टर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे आणि त्यांच्यावर घरीच उपचार केले जाणार आहेत. माध्यम आणि इतर लोकांनी कोणतेही तर्क लावू नका अशी आम्ही विनंती करत आहोत. धर्मेंद्र आणि त्यांच्या कुटुंबियांना यावेळी प्रायव्हसी द्यावी ही विनंती."

पुढे सनी देओलने चाहत्यांचे आभार मानले आहेत. "धर्मेंद्र हे यापुढेही स्वस्थ राहावे, त्यांच्या आरोग्यासाठी  आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी चाहत्यांनी प्रार्थना करा, प्रेम आणि शुभेच्छा. कृपया त्यांच्याप्रती आदर ठेवा कारण त्यांचं चाहत्यांवर खूप प्रेम आहे."

धर्मेंद्र यांना सकाळी साडेसात वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यांच्या जुहू येथील घराबाहेर चाहत्यांची आणि माध्यमांची गर्दी झाली आहे. आपला आवडता अभिनेता बरा होतोय याचा सर्वांनाच आनंद आहे. संपूर्ण देओल कुटुंब धर्मेंद्र यांच्याजवळ उपस्थित आहे.

Web Title : धर्मेंद्र अस्पताल से डिस्चार्ज; सनी देओल की टीम ने दिया बयान

Web Summary : अभिनेता धर्मेंद्र को अस्पताल से छुट्टी मिली, घर ले जाया गया। सनी देओल की टीम ने पुष्टि की कि उनका इलाज घर पर होगा। उन्होंने निजता का अनुरोध किया और धर्मेंद्र के शीघ्र स्वस्थ होने और लंबे जीवन के लिए प्रशंसकों की प्रार्थनाओं और प्यार के लिए धन्यवाद दिया। परिवार एकजुट है और समर्थन के लिए आभारी है।

Web Title : Dharmendra Discharged from Hospital; Sunny Deol's Team Issues Statement

Web Summary : Veteran actor Dharmendra was discharged from the hospital and taken home. Sunny Deol's team confirmed he will receive home treatment. They requested privacy and thanked fans for their prayers and love for Dharmendra's speedy recovery and long life. The family is united and appreciative of the support.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.