नेहा कक्करच्या 'O Sajna' वर थिरकतेय धनश्री वर्मा, गाणं रिलीज होताच व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 17:49 IST2022-09-19T17:49:40+5:302022-09-19T17:49:58+5:30
बॉलिवूडची गायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

नेहा कक्करच्या 'O Sajna' वर थिरकतेय धनश्री वर्मा, गाणं रिलीज होताच व्हायरल
बॉलिवूडची गायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिचं नवं गाणं ओ सजना प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात नेहा कक्करसोबत धनश्री वर्मा आणि प्रियांक शर्मा थिरकतायेत.
या गाण्याविषयी बोलताना नेहा कक्कर म्हणते “ओ सजना” हे गाणे गाताना आणि चित्रीकरण करताना आम्हाला खूप मजा आली, काल या गाण्याचा टीझर कॉलेजच्या कार्यक्रमात दाखवण्यात आला आणि तिथे उपस्थित तरुणांनी ज्याप्रकारे प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल मला खूप आनंद झाला. हे गाणे खूप मजेदार, दमदार आणि जीवंत आहे, मला खात्री आहे की लोकांना हे गाणे नक्कीच आवडेल.
धनश्री वर्मा म्हणते, “ओ सजना चित्रपटात नेहा कक्करसोबत शूटिंग करण्याचा अनुभव खूप छान होता, सेटवर ती माझ्यासाठी बहिणीसारखी होती. आशा आहे की आमचे हे बंध पडद्यावर आमची गतिशीलता प्रतिबिंबित करतात.
प्रियांक शर्मा म्हणतो, “ओ सजना हे गाणे सर्व जुन्या आठवणींना उजाळा देते, आणि हे गाणे मी लहान असताना ऐकलेले मला आठवते. नेहा आणि टीमसोबत एवढा उत्तम ट्रॅक रिक्रिएट करणं हे स्वतःच एक काम आहे, मला खात्री आहे की लोकांना हे गाणं नक्कीच आवडेल. नेहा आणि धनश्रीसोबत हे गाणे चित्रित करताना मला खूप मजा आली." तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केलेले, गीत जानी यांनी लिहिले आहे आणि नेहा कक्करने संगीत दिले आहे.