Dhamaal 4 Release Date: 'बिग बॉस मराठी'नंतर रितेश देशमुख पुन्हा 'धमाल' करणार! सिनेमाची रिलीज डेट जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 13:33 IST2026-01-27T13:30:43+5:302026-01-27T13:33:38+5:30

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या 'धमाल' च्या चौथ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, आता या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Dhamaal 4 Release Date announced starring Riteish Deshmukh ajay devgn sanjay mishra | Dhamaal 4 Release Date: 'बिग बॉस मराठी'नंतर रितेश देशमुख पुन्हा 'धमाल' करणार! सिनेमाची रिलीज डेट जाहीर

Dhamaal 4 Release Date: 'बिग बॉस मराठी'नंतर रितेश देशमुख पुन्हा 'धमाल' करणार! सिनेमाची रिलीज डेट जाहीर

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या 'धमाल' च्या चौथ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, आता या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. निर्मात्यांनी 'धमाल ४' (Dhamaal 4) च्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल केला असून, आता या चित्रपटाची रिलीज डेट आणखी पुढे ढकलण्यात आली आहे. 

'धमाल ४' २०२६ च्या ईदच्या मुहूर्तावर (१९ मार्च २०२६) प्रदर्शित होईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र निर्मात्यांनी हा निर्णय बदलला आहे. आता हा चित्रपट ३ जुलै २०२६ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. बॉक्स ऑफिसवरील बिग बजेट सिनेमांसोबतची टक्कर टाळणं हे चित्रपटाची रिलीज डेट पुढे जाण्याचं मुख्य कारण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात रणवीर सिंगचा 'धुरंधर २' (Dhurandhar 2) आणि यशचा 'टॉक्सिक' (Toxic) हे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांशी टक्कर टाळण्यासाठी आणि 'धमाल ४' ला सोलो रिलीजचा फायदा मिळावा, या उद्देशाने निर्मात्यांनी हा महत्त्वपूर्ण बदल केला आहे. त्यामुळे 'धमाल ४' पाहण्यासाठी प्रेक्षकांना ३ जुलै २०२६ पर्यंत वाट बघावी लागेल.

'धमाल ४' मध्ये पुन्हा एकदा जुनी 'गँग' धमाल करताना दिसणार आहे. यात अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी आणि संजय मिश्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय यावेळी चित्रपटात रवी किशन विलनच्या भूमिकेत दिसणार असून ईशा गुप्ता, संजीदा शेख, अंजली आनंद आणि उपेंद्र लिमये हे कलाकारही प्रेक्षकांचे मनोरंजन करतील. चित्रपटाचे दिग्दर्शन पुन्हा एकदा इंद्र कुमार यांनी केले आहे.

'धमाल' फ्रँचायझी आपल्या 'स्लॅपस्टिक कॉमेडी'साठी ओळखली जाते. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाने (टोटल धमाल) जगभरात २०० कोटींहून अधिक कमाई केली होती, त्यामुळे चौथ्या भागाकडूनही निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. 

Web Title : 'धमाल 4' की रिलीज डेट जुलाई 2026 तक बढ़ी: यहाँ देखें विवरण

Web Summary : 'धमाल 4' की रिलीज डेट 'धुरंधर 2' और 'टॉक्सिक' जैसी बड़ी बजट फिल्मों से टकराव से बचने के लिए 3 जुलाई, 2026 तक बढ़ा दी गई है। फिल्म में अजय देवगन, रितेश देशमुख और अन्य कलाकार हैं, और इंद्र कुमार निर्देशन कर रहे हैं। निर्माताओं को बॉक्स ऑफिस कलेक्शन को अधिकतम करने के लिए सोलो रिलीज की उम्मीद है।

Web Title : 'Dhamaal 4' Release Date Pushed to July 2026: Details Here

Web Summary : The release of 'Dhamaal 4' has been moved to July 3, 2026, to avoid clashing with big-budget films like 'Dhurandhar 2' and 'Toxic'. The film stars Ajay Devgn, Ritesh Deshmukh, and others, with Indra Kumar directing. The makers are hoping for a solo release to maximize box office collections.