Dhadak Review: 'धडक'च्या शूटिंगच्या एक दिवसआधी अशी काही होता जान्हवी कपूरची अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 12:06 IST2018-07-20T11:54:06+5:302018-07-20T12:06:54+5:30
आज दिगवंत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरचा पहिला सिनेमा धडक सिनेमागृहात धडकला आहे. श्रीदेवी या लेकीचा डेब्यू पाहण्यासाठी अतिशय उत्सुक होत्या.

Dhadak Review: 'धडक'च्या शूटिंगच्या एक दिवसआधी अशी काही होता जान्हवी कपूरची अवस्था
आज दिगवंत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरचा पहिला सिनेमा धडक सिनेमागृहात धडकला आहे. श्रीदेवी लेकीचा डेब्यू पाहण्यासाठी अतिशय उत्सुक होत्या. मात्र ते पाहण्यासाठी दुर्दैवाने त्या राहिल्या नाहीत. जान्हवीला सिल्वर स्क्रिनवर पाहण्याआधीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. जान्हवी प्रमोशनच्या दरम्यान अनेक वेळा आईच्या ठिकाणी भावूक झाली होती. शशांक खेतान दिग्दर्शित 'धडक' सिनेमात जान्हवी आणि ईशान खट्टर यांच्या मुख्य भूमिका आहेत. ज्या दिवशीपासून धडक सिनेमाची घोषणा झालीय त्यादिवसापासून प्रेक्षकांच्या जान्हवीकडून अनेक अपेक्षा आहेत. सिनेमात ज्या पद्धतीचा साधा सरळ अभिनय जान्हवीने केला आहे तो खूप कमी लोकांना पहिल्या सिनेमात करायला जमतो. धडकच्या प्रमोशन दरम्यान जान्हवीने सांगितले होते की, धडकचे शूटिंग सुरु होण्याच्या एक दिवस आधी ती पूर्ण रात्र झोपली नव्हती.
70 कोटींचा बजेट असलेला या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. समीक्षकांची पसंतीदेखील या सिनेमाला मिळतेय. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटींची उड्डाणे घेतायेत हे आपल्याला या आठवड्यात समजेल. जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना भवली आहे हे आपल्याला ट्रेलर रिलीज झाल्यानंतरच कळले.
‘धडक’ एक शानदार प्रेमकथा आहे. मराठी चित्रपट ‘सैराट’चा आॅफिशिअल हिंदी रिमेक असलेल्या या चित्रपटाला अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे. ‘सैराट’लाही याच जोडीने संगीत दिले होते. ‘झिंग झिंग झिंगाट’च्या तालावर या ‘सैराट’ने सिने रसिकांना अक्षरशा: याड लावले होते. चित्रपट राजस्थानी पार्श्वभूमीवर आधारित आहे. यात जान्हवी व ईशान खट्टर दोघेही राजस्थानी टोनमध्ये बोलताना दिसताहेत.