शाहिद कपूरच्या 'देवा' सिनेमाचं शूटिंग झालं पुर्ण, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला, कधी रिलीज होणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 10:32 IST2024-07-10T10:26:23+5:302024-07-10T10:32:40+5:30

बहुचर्चित 'देवा' (Deva) या सिनेमाचं शुटिंग पुर्ण झालं आहे.

Deva Wrap Up Party Shahid Kapoor Pooja Hegde Attends Movie scheduled to release on 11 October 2024 | शाहिद कपूरच्या 'देवा' सिनेमाचं शूटिंग झालं पुर्ण, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला, कधी रिलीज होणार ?

शाहिद कपूरच्या 'देवा' सिनेमाचं शूटिंग झालं पुर्ण, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला, कधी रिलीज होणार ?

बॉलिवूडचा चॉकेलट हिरो या नावाने लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे शाहिद कपूर (Shahid Kapoor). जबरदस्त पर्सनालिटी आणि गुड लुकिंग यांच्या जोरावर शाहिदने तुफान लोकप्रियता मिळवली. शाहिदच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  शाहिदच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्याच्या बहुचर्चित 'देवा' (Deva) या सिनेमाचं शुटिंग पुर्ण झालं आहे.


शाहिद कपूर आणि पूजा हेगडे यांची मुख्य भूमिका असलेला 'देवा' हा एक ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. 'देवा' चित्रपटाचे शूटिंग पुर्ण झालं आहे. रॅप-अप पार्टीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.  roykapurfilmsनं आपल्या इनस्टाग्रामवर रॅप-अप पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट पाहायला मिळतेय.

'देवा' हा या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट 11 ऑक्टोबर 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओ आणि रॉय कपूर फिल्म्स यांनी केली आहे. शाहीदने गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर 'देवा' सिनेमाची घोषणा केली होती. या पोस्टसोबतच शाहिदने चित्रपटातील त्याचा फर्स्ट लुक देखील शेअर केला होता, ज्यामध्ये शाहिद एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला. 

शाहिद नुकताच 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या सिनेमात झळखला होता. शाहिदने उत्तम अभिनय, नृत्यकौशल्य आणि पर्सनालिटी या तिघांच्या जोरावर इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. लोकप्रिय अभिनेत्याचा लेक असूनही शाहिदचा इंडस्ट्रीतील स्ट्रगल काही चुकला नाही. बऱ्याच सिनेमात काम केल्यानंतर तो प्रसिद्धीझोतात आला. शाहिदने 'विवाह', 'इश्क विश्क', 'कबीर सिंग', 'फिदा', 'जब वी मेट' असे कितीतरी सुपरहिट सिनेमा दिले आहेत. 

Web Title: Deva Wrap Up Party Shahid Kapoor Pooja Hegde Attends Movie scheduled to release on 11 October 2024