रणवीर सिंग - दीपिका पादुकोणचे लग्न झालं फिक्स, या अभिनेत्याने दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 10:51 IST2018-08-14T10:41:55+5:302018-08-14T10:51:02+5:30

सध्या बॉलिवूडमध्ये दोनच चर्चा आहेत एक तर प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या साखरपुड्याची तर दुसरी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची.

Deepika - Ranvir marriage date fixed this actor congratulated them | रणवीर सिंग - दीपिका पादुकोणचे लग्न झालं फिक्स, या अभिनेत्याने दिल्या शुभेच्छा

रणवीर सिंग - दीपिका पादुकोणचे लग्न झालं फिक्स, या अभिनेत्याने दिल्या शुभेच्छा

ठळक मुद्दे20 नोव्हेंबरला दोघे लग्नाच्या पवित्र बंधनात अडकणार आहेत.  दीपिका आणि रणवीर गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

सध्या बॉलिवूडमध्ये दोनच चर्चा आहेत एक तर प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या साखरपुड्याची तर दुसरी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची. दीपिका आणि रणवीरच्या लग्नाची तारीखदेखील कन्फर्म झाली आहे. 2018च्या सरुवातील दोघांनी साखरपुडा केल्याची माहितीसमोर आली. तेव्हापासून दोघे लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. रणवीर आणि दीपिकाचा साखरपुडा श्रीलंकेत झाला होता.  


20 नोव्हेंबरला दोघे लग्नाच्या पवित्र बंधनात अडकणार असल्याचे समजतेय. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार दीपिका आमि रणवीरसाठी  आयुष्यातील हा क्षण खूप खास असल्याने फक्त काही जवळच्या मित्र परिवाला आमंत्रण देण्यात येणार आहे. लग्न इटलीमधील लेक कोमोमध्ये होणार आहे. रणवीर आणि दीपिकाचे हे फेव्हरेट ठिकाण आहे. यानंतर रणवीर आणि दीपिका भारतात येऊन सुद्धा रिसेप्शन देणार आहेय एक रिसेप्शन मुंबईत होणार आहे तर दुसर दीपिकाचे होम टाऊन बेंगळुरुमध्ये होईल.  दोघांचे लग्न दाक्षिणात्य पद्धतीने होणार आहे. लग्नासाठी दीपिकाने सध्या कोणताच प्रोजेक्ट साईन केलं नसल्याचे समजतेय. 



 


अभिनेता कबीर बेदीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दीपिका आणि रणवीरला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कबीर बेदीने ट्वीट केले आहे की, खूप सुंदर कपल आहे आणि इटलीसुद्धा सुंदर लोकेशन आहे. रणवीर आणि दीपिकाला अनेक शुभेच्छा. त्यांना आयुष्यभर आनंद मिळो. 


 दीपिका आणि रणवीर गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी कधीच पब्लिकली आपले रिलेशन स्वीकारले नाही. परंतू सोशल मीडियावरील त्यांचे पोस्ट पाहून ते रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जात होते. आता तर रणवीर दीपिकाच्या इंस्टाग्राम फोटोवर ओपनली कमेंट करत असतो. 

Web Title: Deepika - Ranvir marriage date fixed this actor congratulated them