Deepika Ranveer Wedding: दीपवीरच्या लग्नाची तयारी सुरू, समोर आला पहिला फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 11:48 IST2018-11-11T11:46:09+5:302018-11-11T11:48:28+5:30

इटलीच्या सुप्रसिद्ध लेक कोमो येथे दीपवीर लग्नगाठ बांधणार आहेत. तूर्तास या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे आणि या तयारीचा पहिला फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Deepika Ranveer Wedding: ranveer singh and deepika padukones wedding preparations started in italy | Deepika Ranveer Wedding: दीपवीरच्या लग्नाची तयारी सुरू, समोर आला पहिला फोटो!

Deepika Ranveer Wedding: दीपवीरच्या लग्नाची तयारी सुरू, समोर आला पहिला फोटो!

बॉलिवूडचे सर्वाधिक रोमॅन्टिक कपल दीपिका पादुकोणरणवीर सिंग यांचे लग्न दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. काल शनिवारी दीप-वीर आपल्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी इटलीला रवाना झालेत. इटलीच्या सुप्रसिद्ध लेक कोमो येथे दीपवीर लग्नगाठ बांधणार आहेत. तूर्तास या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे आणि या तयारीचा पहिला फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. दीपवीरच्या फॅन्स पेजवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. दीपिका व रणवीरच्या लग्नाची तयारी, असे कॅप्शनमध्ये लिहिले गेले आहे.


हा फोटो लेक कोमोचा असल्याचा दावा केला जात आहे. फोटोत दिसतेयं त्याप्रमाणे काही लोक सजावटीचे काम करत आहेत. 
गत २१ आॅक्टोबरला दीपिका व रणवीरने लग्नाची तारीख जाहिर केली होती. तेव्हापासून दोघेही लग्नाच्या तयारीत बिझी आहेत. १४ नोव्हेंबरला दोघेही साऊथ इंडियन पद्धतीने लग्न करणार आहेत. यानंतर १५ तारखेना नॉर्थ इंडियन पद्धतीने हे लग्न होणार आहे.

अन् इटलीला रवाना होण्यापूर्वी नाराज झाली दीपिका


काल रात्री दीपिका व रणवीर दोघेही लग्नासाठी इटलीला रवाना झाले. यावेळी दोघांच्याही चेहºयावरचा आनंद पाहण्यासारखा होता. पण याचदरम्यान रणवीरच्या अतिउत्साहात केलेल्या एका गोष्टीमुळे दीपिका काहीशी नाराज झालेली दिसली. मुंबई एअरपोर्टवर आधी रणवीर पोहोचला. पाठोपाठ दीपिका.   दीपिकाला घ्यायला रणवीर समोर आला. यावेळी त्याने स्पीकरवर ‘मेहंदी लगा के रखना...’ गाणे प्ले केले होते. हे गाणे प्ले करत तो दीपिकाजवळ आला आणि त्याने तिला हॅलो म्हटले. पण रणवीरची हे वागणे कदाचित दीपिकाला आवडले नाही. तिच्या चेहºयावरची नाराजी कॅमेºयांनी लगेच टीपली. यानंतर दीपिका व रणवीर दोघेही वेगवेगळे पुढे निघाले.

Web Title: Deepika Ranveer Wedding: ranveer singh and deepika padukones wedding preparations started in italy