Deepika Ranveer Wedding : दीपवीरचे फोटो न मिळाल्याने चाहते नाराज, अशी उडवली खिल्ली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 12:46 IST2018-11-15T12:44:08+5:302018-11-15T12:46:22+5:30

अद्याप दीपवीरच्या लग्नाचा एकही अधिकृत फोटो समोर आलेला नाही. दीपवीरच्या या निर्णयामुळे चाहते नाराज आहेत आणि ही नाराजी या ना त्या पद्धतीने सोशल मीडियावर समोर येत आहेत.

 Deepika Ranveer Wedding: Ranveer Singh and Deepika Padukone wedding photos memes viral social media | Deepika Ranveer Wedding : दीपवीरचे फोटो न मिळाल्याने चाहते नाराज, अशी उडवली खिल्ली!

Deepika Ranveer Wedding : दीपवीरचे फोटो न मिळाल्याने चाहते नाराज, अशी उडवली खिल्ली!

ठळक मुद्देदीपवीरच्या लग्नाचे फोटो न शेअर करण्यावर सोशल मीडियावर एकापेक्षा एक भारी मीम्स व्हायरल होत आहेत.

रणवीर सिंग-दीपिका पादुकोण लग्नाच्या बंधनात अडकलेत. काल १४ नोव्हेंबरला कोंकणी पद्धतीने त्यांनी लग्नगाठ बांधली. आज १५ नोव्हेंबरला दीपवीर पुन्हा एकदा सिंधी पद्धतीने विवाह करणार आहेत. पण अद्याप दीपवीरच्या लग्नाचा एकही अधिकृत फोटो समोर आलेला नाही. दीपवीरच्या या निर्णयामुळे चाहते नाराज आहेत आणि ही नाराजी या ना त्या पद्धतीने सोशल मीडियावर समोर येत आहेत. होय, तूर्तास दीपवीरच्या लग्नाचे फोटो न शेअर करण्यावर सोशल मीडियावर एकापेक्षा एक भारी मीम्स व्हायरल होत आहेत.

 


अनुष्का शर्माच्या ‘सुईधागा’ या चित्रपटातील एका सीनवरही   मीम्स बनवण्यात आले आहेत. यापूर्वी अनुष्काच्या ‘सुईधागा’ या फोटोवर अनेक मीम्स व्हायरल झाले होते.


एका युजरने तर दोन ब्लँक फोटो शेअर करत, अखेर दीपवीरच्या लग्नाचे फोटो आलेत, अशा पद्धतीने खिल्ली उडवली आहे.

एका युजरने एका मुलाचा फोटो शेअर करत, आपली नाराजी व्यक्त केली आहेत. या फोटोत हा मुलगा उदास बसलेला दिसतोय. याच्या कॅप्शनमध्ये दीपवीरच्या फोटोच्या प्रतीक्षेत असे लिहिण्यात आले आहे.

रणवीरच्या ‘पद्मावत’मधील एका डायलॉगवरूनही भन्नाट मीम्स बनवण्यात आले आहेत.

एकंदर हे मीम्स पाहणे चांगलेचं मजेशीर आहे. पाहा तर...

Web Title:  Deepika Ranveer Wedding: Ranveer Singh and Deepika Padukone wedding photos memes viral social media