Deepika Ranveer Wedding : लहंगा दोगी क्या? दीपवीरच्या लग्नाच्या फोटोंवरही फनी मीम्स!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 10:51 IST2018-11-16T10:50:02+5:302018-11-16T10:51:59+5:30

होय, इंटरनेटच्या कल्पक  नेटक-यांनी रणवीर व दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंनाही सोडले नाही. त्यांच्या लग्नाच्या फोटोंवरचे फनी मीम्स सोशल मीडियावर वा-यासारखे व्हायरल होत आहेत.

Deepika Ranveer Wedding: deepveer wedding pics fired up these hilarious memes | Deepika Ranveer Wedding : लहंगा दोगी क्या? दीपवीरच्या लग्नाच्या फोटोंवरही फनी मीम्स!!

Deepika Ranveer Wedding : लहंगा दोगी क्या? दीपवीरच्या लग्नाच्या फोटोंवरही फनी मीम्स!!

ठळक मुद्देअनेक मीम्स व्हायरल झाले आहेत. ते पाहून तुम्हालाही कल्पक नेटक-यांच्या बुद्धीची दाद द्यावीशी वाटेल.

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण अखेर एकमेकांचे झालेत. कोंकणी आणि सिंधी पद्धतीने लग्नबंधनात अडकल्यानंतर दोघांनीही सोशल मीडियावर आपल्या लग्नाचे फोटो शेअर केलेत. आता या फोटोवर फनी मीम्स बनणार नाहीत तर आश्चर्य. होय, इंटरनेटच्या कल्पक  नेटक-यांनी रणवीर व दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंनाही सोडले नाही. त्यांच्या लग्नाच्या फोटोंवरचे फनी मीम्स सोशल मीडियावर वा-यासारखे व्हायरल होत आहेत.
लग्नात रणवीर अगदी राजबिंडा दिसतोय. पण काहींना त्याचा हा स्टाईलिश लूकही पचला नाही. रणवीर काहीसा वेगळ्या अंदाजात दिसेल, असा त्यांचा अंदाज असावा. मग काय, लोकांनी त्यावरही जोक्स केलेत.



‘मी निराश आहे. रणवीर आपल्या लग्नात जम्प सूट घालणार, असे मला वाटले होते,’ असे लिहित एका युजरने गुगली टाकली.

सिंधी पद्धतीच्या लग्नात रणवीरने लाल रंगाची शेरवानी आणि दीपिकाने लाल रंगाचा लेहंगा घातला आहे. या फोटोत रणवीर दीपिकाच्या कानात काहीतरी कुजबुजताना दिसतोय. यावरूनही जोक्स झालेत. रणवीर दीपिकाला तिचा लहेंगा मागतोय, असे लिहित एका युजरने यावर भन्नाट जोक मारला.

अशाच प्रकारचे अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत. ते पाहून तुम्हालाही कल्पक नेटक-यांच्या बुद्धीची दाद द्यावीशी वाटेल. पाहा तर...

 







 

Web Title: Deepika Ranveer Wedding: deepveer wedding pics fired up these hilarious memes