करीना कपूर आणि अनुष्का शर्मापेक्षा वेगळे आहे दीपिका पादुकोणचे लग्न, जाणून घ्या या खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 11:34 IST2018-10-22T11:26:06+5:302018-10-22T11:34:51+5:30

सोनम कपूर - आनंद आहुजा, नेहा धुपिया- अंगद बेदी हे याच वर्षी लग्नाच्याबेडीत अडकले आहे. सोनम आणि आनंदने मोठ्या थाटा-माटात आणि रिती रिवाजानुसार लग्न केले तर नेहा आणि अंगदने सीक्रेट मॅरेज केले

Deepika Padukone's wedding is different from Kareena Kapoor and Anushka Sharma | करीना कपूर आणि अनुष्का शर्मापेक्षा वेगळे आहे दीपिका पादुकोणचे लग्न, जाणून घ्या या खास गोष्टी

करीना कपूर आणि अनुष्का शर्मापेक्षा वेगळे आहे दीपिका पादुकोणचे लग्न, जाणून घ्या या खास गोष्टी

ठळक मुद्दे हे वर्ष बॉलिवूडसाठी लग्न सराईचे ठरले15 नोव्हेंबरला दीपिका आणि रणवीर लग्न बंधनात अडकणार आहेत

गेल्या अनेक दिवसांपासून बी-टाऊनमध्ये चालू असलेल्या दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाची तारीख अखेर समोर आली आहे. 14 आणि 15 नोव्हेंबरला दोघे लग्न करणार आहेत. हे वर्ष बॉलिवूडसाठी लग्न सराईचे ठरले. सोनम कपूर - आनंद आहुजा, नेहा धुपिया- अंगद बेदी हे याच वर्षी लग्नाच्याबेडीत अडकले आहे. सोनम आणि आनंदने मोठ्या थाटा-माटात आणि रिती रिवाजानुसार लग्न केले तर नेहा आणि अंगदने सीक्रेट मॅरेज केले. दोघांच्या लग्नाची घोषणा सोशल मीडियावरुन करण्यात आली.  

या सगळ्या कलाकारांनी रिती-रिवाज पूर्ण झाल्यावर लग्नाची घोषणा केली. सोनमने आपल्या लग्नाची घोषणा पत्रिका छापून झाल्यावर एका आठवडा आधी केली. तर दीपिका आणि रणवीरने लग्नाची तारीख खूप लवकर जाहीर केली. अजून दोघांच्या लग्नाचे लोकेशन आणि गेस्टलिस्ट बाहेर नाही आली.  

दीपवीर नोव्हेंबरमध्ये लग्न करणार, अशी चर्चा सुरूवातीपासूनचं होती. मध्यंतरी नोव्हेंबरचे मुहूर्त पुढील वर्षाच्या सुरूवातीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचेही वृत्त होते. पण हे वृत्त खोटे ठरवत दीपिका व रणवीरने आपल्या चाहत्यांना लग्नाची गोड बातमी दिली. 

दोघांच्याही कामाबद्दल बोलायचे तर रणवीर सध्या ‘सिम्बा’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ‘गली ब्वॉय’ आणि १९९३ व्या क्रिकेट वर्ल्ड कप विजयावर आधारित ‘८३’ या चित्रपटातही तो बिझी आहे. इतकेच नाही तर करण जोहरच्या ‘तख्त’ या मल्टीस्टारर चित्रपटातही त्याची वर्णी लागली आहे. दीपिकाचे म्हणाल तर ‘पद्मावत’नंतर तिने दिग्दर्शिका  मेघना गुलजारचा नवा प्रोजेक्ट साईन केला आहे

Web Title: Deepika Padukone's wedding is different from Kareena Kapoor and Anushka Sharma