'पठाण'च्या ट्रेलरमधून दीपिका पादुकोणची भगव्या रंगाची बिकीनी गायब!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 18:26 IST2023-01-10T18:23:35+5:302023-01-10T18:26:32+5:30
Pathaan Movie :'पठाण' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दीपिका पादुकोण फक्त पिवळ्या बिकिनीमध्ये पाहायला मिळाली.

'पठाण'च्या ट्रेलरमधून दीपिका पादुकोणची भगव्या रंगाची बिकीनी गायब!
'पठाण' चित्रपट (Pathaan Movie) प्रदर्शित होण्याआधीच त्यावर सुरू असलेले सर्व वाद ट्रेलरमधून गायब झाले आहेत. 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यात दीपिका पादुकोण(Deepika Padukone)ने घातलेली भगव्या रंगाची बिकिनी प्रत्यक्षात ट्रेलरमध्ये दाखवलेली नाही. दीपिका पादुकोण फक्त पिवळ्या बिकिनीमध्ये पाहायला मिळाली.
शाहरुख खानचा आगामी चित्रपट पठाण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटातील बेशरम रंग गाण्यात दीपिका पादुकोणनं परिधान केलेली भगव्या रंगाची बिकनी वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. या वादानंतर त्यात सेन्सॉर बोर्डाला हस्तक्षेप करावा लागला. आता नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. केवळ बादशाहच नाही तर जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण यांनीही यावेळी चाहत्यांची मने जिंकली आहेत. ट्रेलरमध्ये डिंपल कपाडियाचा डॅशिंग लूकही पाहायला मिळाला.
ट्रेलर पाहिल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? 'पठाण' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यावर सुरू असलेले सर्व वाद ट्रेलरमधून गायब झाले आहेत. 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यात दीपिका पादुकोणने घातलेली भगवी बिकिनी प्रत्यक्षात ट्रेलरमध्ये दाखवलेली नाही. दीपिका पदुकोण फक्त पिवळ्या बिकिनीमध्ये दिसत आहे. ट्रेलर वादाच्या भोवऱ्यात अडकू नये यासाठी निर्मात्यांनी वादग्रस्त ठरलेल्या गोष्टी न दाखवण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवली जाते.
पठाणच्या ट्रेलरची सुरूवात दुबईतील बुर्ज खलिफा येथून होते. जॉन अब्राहम एका मोठ्या काडतुसाने कार उडवताना दिसतो आहे. चेहऱ्यावरून मास्क काढतो आणि पार्श्वभूमीत डिंपल कपाडियाचा दमदार आवाज येतो. हा चित्रपट एका खासगी दहशतवादी गट एक्सला पकडण्यावर आधारित आहे, ज्यामध्ये शाहरुख खान मुख्य भूमिका साकारणार आहे. चाहत्यांना किंग खानकडून खूप अपेक्षा घेऊन बसले आहेत. चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणाऱ्यांनाही का लावले नाही.