शाहरूखच्या 'पठाण'साठी मोठं मानधन घेणार दीपिका पादुकोण, आकडा वाचून व्हाल अवाक्...

By अमित इंगोले | Updated: November 7, 2020 16:15 IST2020-11-07T16:07:40+5:302020-11-07T16:15:53+5:30

'पठाण' सिनेमात जॉन निगेटीव्ह भूमिकेत दिसेल आणि यासाठी तो २० कोटी रूपये मानधन घेईल. आता अशी माहिती समोर आली आहे की, या सिनेमासाठी दीपिका पादुकोण किती मानधन घेणार आहे. 

Deepika Padukone will charge 15 crore rupees for Shah Rukh Khan and John Abraham starrer Pathan | शाहरूखच्या 'पठाण'साठी मोठं मानधन घेणार दीपिका पादुकोण, आकडा वाचून व्हाल अवाक्...

शाहरूखच्या 'पठाण'साठी मोठं मानधन घेणार दीपिका पादुकोण, आकडा वाचून व्हाल अवाक्...

काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती की, सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या 'पठाण'मध्ये शाहरूख खानसोबत जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण दिसणार आहे. हा एक अ‍ॅक्शन ड्रामा सिनेमात असेल ज्याचं शूटींग नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत सुरू होईल. या सिनेमात जॉन निगेटीव्ह भूमिकेत दिसेल आणि यासाठी तो २० कोटी रूपये मानधन घेईल. आता अशी माहिती समोर आली आहे की, या सिनेमासाठी दीपिका पादुकोण किती मानधन घेणार आहे. 

'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार, या सिनेमासाठी ती जवळपास १५ कोटी रूपये मानधन घेणार आहे. एका सूत्राने सांगितलं की, दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट यावेळी सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. शाहरूख खान आणि यशराज फिल्म्सची इच्छा आहे की, दीपिकाने या सिनेमात फीमेल लीडची भूमिका साकारावी. पुढील वर्षी दीपिका या सिनेमाचं शूटींग सुरू करेल. (दीपिका पादुकोणच्या कारचा पाठलाग करत होते फोटोग्राफर्स, लीगल अ‍ॅक्शनची दिली तिने धमकी...)

असे सांगितले जात आहे की, शाहरूख खानचं मानधन बाजूला केलं जर 'पठाण' सिनेमाचं बजेट जवळपास २०० कोटी रूपये असेल. असे सांगितले जात आहे की, आदित्य चोप्राला हा अ‍ॅक्शन सिनेमा इंटरनॅशनल लेव्हलचा करायचा आहे. असे मानले जात आहे की २०२१ च्या दिवाळीत हा सिनेमा रिलीज केला जाऊ शकतो. पण कोरोना व्हायरसमुळे या सिनेमाबाबत अजून निश्चित काही सांगण्यात आलेलं नाही. 

पापाराजीसोबत दीपिकाचा वाद

दरम्यान, दीपिका पापाराजीसोबत झालेल्या वादामुळे चर्चेत आहे.  freepressjournal.com च्या रिपोर्टनुसार, दीपिका पादुकोण नुकतीच धर्मा प्रॉडक्शनच्या जुन्या ऑफिसमध्ये आढळून आली होती. इथेच तिने पापाराजींना खडेबोल सुनावल्याचे समजते. रिपोर्टनुसार, दीपिकासोबत अनन्याही होती. दोघांचे अनेक फोटो क्लिक केल्यावरही फोटोग्राफर्स दीपिकाच्या कारचा पाठलाग करू लागले होते. 

दीपिकाचा फोटोग्राफर्ससोबत वाद झाल्यावर तिचे बॉडीगार्ड्स बाहेर आले होते आणि तिचा पापाराजीसोबत वाद झाला होता. रिपोर्ट्सनुसार, यानंतर वाद इतका वाढला की, तिला कारमधून बाहेर यावं लागलं आणि तिने समजावण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर तिने फोटोग्राफर्सना लीगल अ‍ॅक्शन घेण्याची धमकीही दिल्याचे सांगितले जात आहे. 

Web Title: Deepika Padukone will charge 15 crore rupees for Shah Rukh Khan and John Abraham starrer Pathan