दीपिका पादुकोणच्या कारचा पाठलाग करत होते फोटोग्राफर्स, लीगल अ‍ॅक्शनची दिली तिने धमकी...

By अमित इंगोले | Published: November 7, 2020 02:08 PM2020-11-07T14:08:24+5:302020-11-07T14:09:03+5:30

दीपिका पादुकोणही आता बाहेर दिसू लागली आहे. पण यावेळी ती बाहेर आलेली असताना तिची पापाराजीसोबत बाचाबाची झाल्याचे समजते.

Deepika Padukone lashes out photographers for chasing car says she may take legal action | दीपिका पादुकोणच्या कारचा पाठलाग करत होते फोटोग्राफर्स, लीगल अ‍ॅक्शनची दिली तिने धमकी...

दीपिका पादुकोणच्या कारचा पाठलाग करत होते फोटोग्राफर्स, लीगल अ‍ॅक्शनची दिली तिने धमकी...

googlenewsNext

दीपिका पादुकोण जेव्हा बाहेर निघते तेव्हा फोटोग्राफर्सचे कॅमेरे तिला कसंही शोधून काढतात. लॉकडाऊन दरम्यान सेलिब्रिटी बाहेर निघाले नाहीत आणि आता ते पुन्हा एकदा बाहेर येणे सुरू झाले आहे. जास्तीत जास्त सेलिब्रिटी एअरपोर्टवर बघायला मिळाले. दीपिका पादुकोणही आता बाहेर दिसू लागली आहे. पण यावेळी ती बाहेर आलेली असताना तिची पापाराजीसोबत बाचाबाची झाल्याचे समजते.

दीपिकासोबत होती अनन्या पांडे

freepressjournal.com च्या रिपोर्टनुसार, दीपिका पादुकोण नुकतीच धर्मा प्रॉडक्शनच्या जुन्या ऑफिसमध्ये आढळून आली होती. इथेच तिने पापाराजींना खडेबोल सुनावल्याचे समजते. रिपोर्टनुसार, दीपिकासोबत अनन्याही होती. दोघांचे अनेक फोटो क्लिक केल्यावरही फोटोग्राफर्स दीपिकाच्या कारचा पाठलाग करू लागले होते. 

दीपिकाच्या बॉडीगार्डसोबत वाद

दीपिकाचा फोटोग्राफर्ससोबत वाद झाल्यावर तिचे बॉडीगार्ड्स बाहेर आले होते आणि तिचा पापाराजीसोबत वाद झाला होता. रिपोर्ट्सनुसार, यानंतर वाद इतका वाढला की, तिला कारमधून बाहेर यावं लागलं आणि तिने समजावण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर तिने फोटोग्राफर्सना लीगल अ‍ॅक्शन घेण्याची धमकीही दिल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, दीपिका नुकतीच शकुन बत्राच्या सिनेमाचं गोव्यातील शूटींग पूर्ण करून मुंबईत दाखल झाली. या सिनेमात तिच्यासोबत अनन्या पांडे आणि सिद्धार्थ चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  
 

Web Title: Deepika Padukone lashes out photographers for chasing car says she may take legal action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.