४ महिन्यांची गरोदर दीपिका करतेय 'सिंघम ३'चं शूटिंग, सेटवरील व्हायरल फोटोंमध्ये दिसला बेबी बंप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 14:22 IST2024-04-17T14:19:22+5:302024-04-17T14:22:25+5:30

Deepika Padukone : गरोदरपणातही दीपिका करतेय सिनेमाचं शूट, 'सिंघम ३'च्या सेटवरील फोटो व्हायरल

deepika padukone shooting for singham again in pregnancy photo viral fans spotted baby bump | ४ महिन्यांची गरोदर दीपिका करतेय 'सिंघम ३'चं शूटिंग, सेटवरील व्हायरल फोटोंमध्ये दिसला बेबी बंप

४ महिन्यांची गरोदर दीपिका करतेय 'सिंघम ३'चं शूटिंग, सेटवरील व्हायरल फोटोंमध्ये दिसला बेबी बंप

बॉलिवूडमधील लोकप्रिय असलेलं दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह हे कपल लवकरच आईबाबा होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच दीपिका-रणवीरने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली. गरोदरपणात दीपिका स्वत:ला जास्तीत जास्त वेळ देत आहे. त्याबरोबरच ती राहिलेलं शूटिंगही पूर्ण करताना दिसत आहे. नुकतंच दीपिकाला 'सिंघम अगेन'च्या सेटवर स्पॉट करण्यात आलं. 

४ महिन्यांची गरोदर असलेली दीपिका रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' सिनेमासाठी शूट करत आहे. 'सिंघम अगेन' या सिनेमाच्या सेटवरील दीपिकाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये दीपिका पोलिसाच्या खाकी वर्दीत दिसत आहे. डोळ्यावर गॉगल लावून दीपिकाचा डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याचा लूक पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये दीपिकाचा बेबी बंपही दिसत आहे. 

रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' सिनेमात दीपिका शक्ती शेट्टी हे पात्र साकारताना दिसणार आहे. या सिनेमात ती एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमातील तिचा पहिला लूक समोर आला होता. हा सिनेमा १५ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

दरम्यान, दीपिका आणि रणवीरने २०१८ मध्ये लग्नाच्या बेडीत अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नानंतर ६ वर्षांनी त्यांना चिमुकल्याची चाहुल लागली आहे. आईबाबा होण्यासाठी दीपिका आणि रणवीर उत्सुक आहेत. सप्टेंबर महिन्यात दीपिका-रणवीरच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. 

Web Title: deepika padukone shooting for singham again in pregnancy photo viral fans spotted baby bump