पेहचान कोण? सिल्व्हर रंगाचा फेस मास्क लावून विचारात आहे दंग, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 16:23 IST2020-06-13T16:22:26+5:302020-06-13T16:23:15+5:30

लॉकडाऊनच्या काळात रणवीरसोबत राहणे सर्वात सोपे आहे, कारण तो 20 तास झोपतोय ज्यामुळे मला सर्व काही करण्याची संधी मिळतेय.

Deepika Padukone Shares a Picture Sporting a Face Mask As She Gears Up For the Weekend | पेहचान कोण? सिल्व्हर रंगाचा फेस मास्क लावून विचारात आहे दंग, कोण आहे ती?

पेहचान कोण? सिल्व्हर रंगाचा फेस मास्क लावून विचारात आहे दंग, कोण आहे ती?

प्रत्येकजण लॉकडाऊनमध्ये त्यांच्या आरोग्याची काळजी घेताना दिसले.अलीकडे अभिनेत्रींचे फेस मास्क बरेच ट्रेंडमध्ये होते. अनेक अभिनेत्री मास्क परिधान करून आपले फोटो शेअर करत होते. आता दीपिका पादुकोणनेही फेस मास्क घातलेला एक फोटो शेअर केला आहे. गंमतीची गोष्ट म्हणजे या सिल्व्हर फेस मास्कमध्ये दीपिका अजिबात ओळखली जात नाही.  

जेव्हा आठवड्यातील प्रत्येक दिवस घरी घालवला जात अशावेळी  शनिवार आणि रविवारची अशी तयारी विचारात घेण्यासारखी आहे.

अशाचप्रकारे बाहेर पडताना कामाच्या ठिकाणी काळजी घेतली तर सुरक्षित राहता येईल, म्हणून नव्या जीवनशैलीसह काम सुरू करण्याच्याही विचारात अनेक कलाकार आहेत. 

काही दिवसांपूर्वी दीपिका पॅरिस फॅशन वीकसाठी फ्रान्सला रवाना होणार होती, परंतु कोरोनाव्हायरसपासून स्वतःचा बचाव तिने हा प्रवास रद्द केला होचा. सध्या दीपिका रणवीरसह घरीच वेळ घालवत आहे.

लॉकडाऊनच्या काळात रणवीरसोबत राहणे सर्वात सोपे आहे, कारण तो 20 तास झोपतोय ज्यामुळे मला सर्व काही करण्याची संधी मिळतेय. जेव्हा तो चार तासांसाठी उठतो, तेव्हा आम्ही एकत्र खातो, चित्रपट पाहतो आणि व्यायाम करतो. या वेळी त्याच्याबरोबर वेळ घालवणे सर्वात आनंददायक असल्याचे तिने सांगितले होते.

Web Title: Deepika Padukone Shares a Picture Sporting a Face Mask As She Gears Up For the Weekend