दीपिका पादुकोणने पती रणवीर सिंगबद्दल केला खुलासा! वाचा काय म्हणाली!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 10:47 IST2018-12-04T10:44:53+5:302018-12-04T10:47:01+5:30

लग्नापूर्वी दीपवीर एकमेकांबद्दल बोलत, पण फार कमी. आता मात्र लग्नानंतर दोघेही एकमेकांबद्दल भरभरून बोलताना दिसत आहेत. होय, दीपिकाने लग्नानंतर पहिल्यांदा‘जीक्यू’ मॅगझिनला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती रणवीरबद्दल अगदी भरभरून बोलली.

deepika padukone reveals about ranveer singhs nature |  दीपिका पादुकोणने पती रणवीर सिंगबद्दल केला खुलासा! वाचा काय म्हणाली!!

 दीपिका पादुकोणने पती रणवीर सिंगबद्दल केला खुलासा! वाचा काय म्हणाली!!

ठळक मुद्देगत १४-१५ नोव्हेंबरला दीपिका व रणवीरने इटलीतील सुप्रिसिद्ध लेक कोमो येथे लग्नगाठ बांधली होती. सिंधी आणि कोंकणी अशा दोन्ही पद्धतीने त्यांनी लग्न केले.

दीपिका पादुकोणरणवीर सिंग सध्याचे बॉलिवूडचे सर्वाधिक चर्चित कपल आहे. इटलीत लग्न केल्यानंतर भारतात दीपवीरच्या लग्नाचे तीन ग्रॅण्ड रिसेप्शन पार पडलेत.
दीपवीरचे नवे नवे लग्न आणि नव्या-नव्या संसाराबद्दल जाणून घेण्यास सगळेच उत्सूक आहेत. लग्नापूर्वी दीपवीर एकमेकांबद्दल बोलत, पण फार कमी. आता मात्र लग्नानंतर दोघेही एकमेकांबद्दल भरभरून बोलताना दिसत आहेत. होय, दीपिकाने लग्नानंतर पहिल्यांदा‘जीक्यू’ मॅगझिनला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती रणवीरबद्दल अगदी भरभरून बोलली.  रणवीर कसा व्यक्ति आहे, हे तिने सांगितले. ती म्हणाली की, रणवीर खूप समजूतदार आणि संवेदनशील व्यक्त आहे. लोकांपुढे तो मस्ती करतो, अगदी स्वत:तील सगळी ऊर्जा खर्च करतो. पण आतून तो तितकाच शांत आहे. हा त्याच्या स्वभावाचा कधीही बाहेर न येणारा पैलू आहे. तो प्रचंड भावूक, प्रचंड बुद्धिवान आहे आणि कधी कधी अगदी लहान मुलासारखा. आता रणवीरवर दीपिका का भाळली, हे तुमच्या लक्षात आले असेलच.

(लग्नानंतर दीपिकाने ‘जीक्यू’साठी ग्लॅमरस फोटोशूट केले.)

या मुलाखतीत येत्या वर्षातील आपल्या योजनांबद्दलही दीपिका बोलली. येणारे वर्ष माझ्यासाठी अतिशय आव्हानात्मक आहे. कारण मेघना गुलजारच्या नव्या चित्रपटात मी अभिनेत्री आणि निर्माता अशा दोन्ही भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय आता माझ्या खांद्यावर घराची जबाबदारीही असणार आहे, असे दीपिका म्हणाली. दीपिकाचा हा चित्रपट अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेच्या आयुष्यावर बेतलेला असणार आहे. 
गत १४-१५ नोव्हेंबरला दीपिका व रणवीरने इटलीतील सुप्रिसिद्ध लेक कोमो येथे लग्नगाठ बांधली होती. सिंधी आणि कोंकणी अशा दोन्ही पद्धतीने त्यांनी लग्न केले. लग्नाचा एकही फोटो लीक होऊ नये, यासाठी दीपवीर दोघांनीही सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. या सुरक्षेवर सुमारे १ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला होता.  

Web Title: deepika padukone reveals about ranveer singhs nature