'जवान'साठी घेतलेल्या मानधनाबाबत दीपिका पदुकोणचा मोठा खुलासा, म्हणाली, "मी या चित्रपटासाठी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 15:21 IST2023-09-15T15:21:11+5:302023-09-15T15:21:42+5:30
Jawan : 'जवान' चित्रपटासाठी दीपिका पदुकोणने किती मानधन घेतलं? अभिनेत्रीनेच केला खुलासा, म्हणाली...

'जवान'साठी घेतलेल्या मानधनाबाबत दीपिका पदुकोणचा मोठा खुलासा, म्हणाली, "मी या चित्रपटासाठी..."
सध्या जिकडेतिकडे शाहरुख खानच्या 'जवान'ची चर्चा आहे. ७ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या 'जवान'ने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. तगडी स्टारकास्ट आणि दमदार कथा असलेला 'जवान' प्रेक्षकांच्या अपेक्षेस खरा उतरल्याचं चित्र आहे. शाहरुखबरोबर या चित्रपटात दमदार अभिनयाने बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने लक्ष वेधून घेतलं.
'जवान' चित्रपटासाठी कलाकारांनी भरपूर मानधन घेतल्याची चर्चा होती. दीपिकाने या चित्रपटात काम करण्यासाठी तब्बल १५ कोटी घेतल्याची चर्चा रंगली होती. याबाबत आता खुद्द अभिनेत्रीने भाष्य करत 'जवान'साठी घेतलेल्या मानधनाचा खुलासा केला आहे. 'द वीक'ला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने जवानसाठी एकही रुपया फी घेतली नसल्याचा खुलासा केला. दीपिका म्हणाली, "मी 'जवान'साठी एकही रुपया फी घेतलेली नाही. यापूर्वी मी रणवीर सिंहच्या '८३' आणि रोहित शेट्टीच्या 'सर्कस'साठीही एकही रुपया घेतला नव्हता."
"मला '८३' या चित्रपटाचा भाग व्हायचं होतं. आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणाऱ्या त्या महिलांना मला ट्रिब्युट द्यायचं होतं. याव्यतिरिक्त मी नेहमीच शाहरुख खान आणि रोहित शेट्टीच्या चित्रपटांत कैमिओसाठी तयार असेन," असंही पुढे दीपिका म्हणाली.
२३ वर्षांनी येणार 'धडकन २'! सुनिल शेट्टी, अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी पुन्हा दिसणार एकत्र?
दरम्यान, 'जवान' चित्रपटाने पहिल्याच दिवशी देशात ७५ कोटींची तर जगभरात १२० कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने चारच दिवसांत ५०० कोटींचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाने आत्तापर्यंत जगभरात ६६० कोटींची कमाई केली आहे.