दीपिका पदुकोणच्या 'या' रीलला मिळाले जगात सर्वाधिक व्ह्यूज, रोनाल्डोलाही टाकलं मागे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 15:17 IST2025-08-05T15:16:53+5:302025-08-05T15:17:17+5:30

दीपिकाची रील झाली वर्ल्ड नंबर १!

Deepika Padukone Reel World Record Views Surpasses Cristiano Ronaldo And Hardik Pandya | दीपिका पदुकोणच्या 'या' रीलला मिळाले जगात सर्वाधिक व्ह्यूज, रोनाल्डोलाही टाकलं मागे!

दीपिका पदुकोणच्या 'या' रीलला मिळाले जगात सर्वाधिक व्ह्यूज, रोनाल्डोलाही टाकलं मागे!

Deepika Padukone Reel World Record: बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 'ओम शांती ओम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. दीपिका ही नेहमीच आपल्याला वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसते. आपल्या प्रभावी अभिनयाने आणि अष्टपैलू योगदानाने केवळ भारतीय सिनेसृष्टीत नव्हे तर जागतिक स्तरावर स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलंय. ती केवळ एक स्टार नाही तर एक जागतिक आयकॉन बनली आहे. आता दीपिकाने आणखी एक नवा इतिहास रचला आहे. 

दीपिका सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे इंस्टाग्रामवर ८० दशलक्ष फॉलोअर्स आहेत. अशातच दीपिकाच्या एका रीलने  नवीन विक्रम रचला आहे. दीपिकाच्या इंस्टाग्राम रीलला १.९ अब्ज पेक्षा जास्त म्हणजेच १९० कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. अशा परिस्थितीत, दीपिकाची ही रील जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी रील बनली आहे. अवघ्या ८ आठवड्यात दीपिकाच्या या रीलला इतके व्ह्यूज मिळालेत. या व्हायरल झालेल्या रीलमध्ये दीपिका एका हॉटेलची जाहिरात करताना दिसली. लोकांनी दीपिकाचा हा प्रमोशनल व्हिडिओ इतका पाहिला की अभिनेत्रीच्या नावावर एक नवा विक्रम तयार झाला.


दीपिकाच्या या रीलने ख्रिस्तियानो रोनाल्डो (५०३ दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यूज) आणि हार्दिक पांड्या (१.६ अब्ज व्ह्यूज) यांनाही मागे टाकलं आहे. दीपिकानं आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक वेळा देशाचं नाव उंचावलं आहे.२०१८ मध्ये 'टाइम' मासिकाने तिला जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान दिलं होतं. त्यानंतर TIME१०० इम्पॅक्ट पुरस्कारही तिला मिळाला. याशिवाय 'फिफा वर्ल्ड कप २०२२'च्या अंतिम सामन्यात, कतारमध्ये दीपिकाने ट्रॉफीचे अनावरण करून इतिहास रचला आणि असं करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. दरम्यान,  दीपिका सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. दीपिका शेवटची 'सिंघम अगेन'मध्ये दिसली होती.

Web Title: Deepika Padukone Reel World Record Views Surpasses Cristiano Ronaldo And Hardik Pandya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.