Deepika Padukone Ranveer Singh Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्याआधीच विकिपीडियाने जाहीर केले त्यांचे लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 18:38 IST2018-11-14T18:35:30+5:302018-11-14T18:38:39+5:30

रणवीर दीपिका यांच्याआधी विकिपीडियानेच त्यांच्या लग्नाची कबुली दिली आहे.

Deepika Padukone Ranveer Singh Wedding: The serious mistake of Wikipedia on Deepavir wedding | Deepika Padukone Ranveer Singh Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्याआधीच विकिपीडियाने जाहीर केले त्यांचे लग्न

Deepika Padukone Ranveer Singh Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्याआधीच विकिपीडियाने जाहीर केले त्यांचे लग्न

ठळक मुद्देकोंकणी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने रंगणार हा लग्नसोहळा विकिपीडियाने आधीच केला पती पत्नी असा उल्लेख


दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. मात्र दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लग्नबेडीत अडकण्याआधीच विकिपीडियाला ते दोघे विवाह बंधनात अडकल्याचे सांगण्याची घाई झाली असल्याचे पाहायला मिळाले. विकिपीडियाने त्यांच्या पेजवर त्यांचा पती पत्नी असा उल्लेख केला आहे.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग आज इटलीत लग्न करत असल्याची सगळ्यांना कल्पना आहे. ते आज कोंकणी पद्धतीने लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाला केवळ त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रीण आणि नातलगांना केवळ बोलावण्यात आलेले आहे. त्यांच्या लग्नाला उपस्थित असलेल्या कोणीलाही त्यांच्या लग्नाचे फोटो काढण्याची परवानगी नाहीये. त्यांच्या लग्नातील पहिला फोटो कधी येणार, त्यांनी लग्न केले असल्याची अधिकृत घोषणा कधी होणार याची आतुरतेने त्यांचे फॅन्स वाट पाहत आहेत. पण त्यांनी लग्नाची अधिकृत घोषणा करण्याआधीच विकिपीडियाने एक चूक केली आहे. त्यांचा पती पत्नी असा उल्लेख आधीच विकिपीडियाने केला आहे.

बॉलिवूडचे सर्वात सुंदर जोडपे अर्थात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्नबंधनात अडकत आहेत. इटलीतील सुप्रसिद्ध लेक कोमो येथे हे रॉयल वेडिंग पार पडत यंदाचे हे सर्वात मोठे लग्न आहे. यापूर्वी याच वर्षात सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांचे लग्न झाले होते. सध्या दीपवीरचे डेस्टिनेशन वेडिंग एक ट्रेडिंग टॉपिक बनले आहे. आज १४ आणि उद्या १५ नोव्हेंबरला हे लग्न होत आहे. कोंकणी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने हा लग्नसोहळा रंगणार आहे.
 

Web Title: Deepika Padukone Ranveer Singh Wedding: The serious mistake of Wikipedia on Deepavir wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.