दीपिका पादुकोण-रणवीर सिंग बनणार शाहरूख खानचे शेजारी, लवकरच शिफ्ट होणार नवीन घरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 12:09 IST2025-01-08T12:08:05+5:302025-01-08T12:09:00+5:30
Deepika Padukone-Ranveer Singh: बॉलिवूडचे लोकप्रिय जोडपे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग सध्या पालकत्वाचा आनंद घेत आहेत.

दीपिका पादुकोण-रणवीर सिंग बनणार शाहरूख खानचे शेजारी, लवकरच शिफ्ट होणार नवीन घरात
बॉलिवूडचे लोकप्रिय जोडपे दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) सध्या पालकत्वाचा आनंद घेत आहेत. दोघेही आनंदी आहेत. दीपिका आणि रणवीरने सप्टेंबर महिन्यात एका मुलीला जन्म दिला. त्यांनी आपल्या मुलीचे नाव दुआ असे ठेवले आहे. तेव्हापासून हे जोडपे त्यांच्या मुलीसोबत अनेकदा दिसले आहे. या जोडप्याने पापाराझींना मुलगी दुआचा चेहराही दाखवला. दीपिका सध्या प्रसूती रजेवर आहे. तर रणवीर सिंगने कामाला सुरुवात केली आहे. दरम्यान, दोघेही नवीन घरात शिफ्ट होणार असल्याच्या वृत्तामुळे चर्चेत आहेत.
बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग त्यांच्या नवीन घरात शिफ्ट होणार आहेत. हे जोडपे लवकरच शाहरुख खानचे शेजारी बनणार आहे. त्याचे नवीन घर शाहरुख खानचे घर मन्नतजवळ आहे. दीपिका-रणवीरच्या या सी फेसिंग बंगल्याची किंमत अंदाजे १०० कोटी रुपये आहे आणि हे घर ११, २६६ स्क्वेअर फूटमध्ये बांधले आहे. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, रणवीर आणि दीपिकाची टेरेस १,३३० स्क्वेअर फूट आहे आणि या इमारतीत १६-१९ मजले आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांच्या घराचे बांधकाम जवळपास पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले आहे.
वर्कफ्रंट
दीपिकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची सिंघम अगेन या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने शक्ती शेट्टीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दीपिका गरोदर होती. सिंघम अगेनपूर्वी, ती कल्की 2898 एडीमध्ये दिसली होती. तिने पठाण, जवान आणि फायटर सारखे चित्रपटही केले आहेत. रणवीर सिंगबद्दल सांगायचे तर तो सिंघम अगेन चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात तो सिम्बाच्या भूमिकेत होता. सिंघमपूर्वी रणवीर रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात दिसला होता. आता रणवीर धुरंधरच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.