तुम्हाला हे माहिती आहे का, दीपिका अन् रणवीरने लग्नाआधी 4 वर्षे गुपचूप उरकला होता साखरपुडा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 16:00 IST2021-03-03T15:54:50+5:302021-03-03T16:00:53+5:30
सहा वर्षांपर्यंत एकमेकांना डेट केल्यानंतर या लव्हबर्ड्सने दीपिका पादुकोण व रणवीर सिंगने लग्न केलं.

तुम्हाला हे माहिती आहे का, दीपिका अन् रणवीरने लग्नाआधी 4 वर्षे गुपचूप उरकला होता साखरपुडा?
सहा वर्षांपर्यंत एकमेकांना डेट केल्यानंतर या लव्हबर्ड्सने दीपिका पादुकोण व रणवीर सिंगने लग्न केलं. 2018 साली इटलीच्या लेक कोमो येथे दीपवीरने कोकणी आणि सिंधी परंपरेनुसार लग्न केले होते. या अतिशय खासगी सोहळ्यात अतिशय जवळचे कुटुंबीय व मित्र उपस्थित होते. दोघांची ऑनस्क्रिन आमि ऑफ स्क्रिन केमिस्ट्री चाहत्यांना आवडते. लग्नाच्या चार वर्षे आधीच दोघांनी साखरपुडा केला होता.
फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत स्वत: दीपिका पादुकोणने हा खुलासा केला. दीपिका म्हणाली होती की, आम्ही दोघांचा ही आपआपला संघर्ष सुरु होता मात्र तरीही आम्ही एकत्र राहिले. एका प्रायव्हेट सेरेमनीमध्ये आम्ही साखरपुडा केला. कोणालाही याबद्दल माहिती नाही. चार वर्षापूर्वी आमचा साखरपुडा झाला होता. याबद्दल फक्त आमच्या कुटुंबीयांना माहिती होती.
भलेही दोघांनी साखरपुडा गुपचूप उरकला असला तरी दीपिका आणि रणवीरच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. दोघांनी इटलीमध्ये कोंकणी आणि सिंधी चालीरिती प्रमाणे लग्न केली. 2013 साली संजय लीला भन्साळींच्या ‘राम लीला’ या सिनेमाच्या शूटींगदरम्यान दीपवीर एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
दीपिकाच्या आयुष्यात त्याआधी काही पुरूष आले होते. तिचे नाव अनेकांशी जोडले गेले होते. रणबीर कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या वेदना तिने सहन केल्या होत्या. रणवीरला जोडीदार निवडताना मात्र ती अगदी बिनधास्त होती. मुळात रणवीरसोबत लग्न करण्याचा तिच्या निर्णयामागे एक भक्कम कारण होते.