४ महिन्यांच्या गरोदर दीपिकाचा 'सिंघम ३'च्या सेटवरील फोटो व्हायरल, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नंन्सी ग्लो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 15:19 IST2024-05-03T15:19:05+5:302024-05-03T15:19:32+5:30
काही दिवसांपूर्वीच दीपिकाला 'सिंघम अगेन'च्या सेटवर स्पॉट करण्यात आलं होतं. आता पुन्हा तिचा सेटवरील फोटो समोर आला आहे.

४ महिन्यांच्या गरोदर दीपिकाचा 'सिंघम ३'च्या सेटवरील फोटो व्हायरल, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नंन्सी ग्लो
बॉलिवूडमधील लोकप्रिय असलेलं दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह हे कपल लवकरच आईबाबा होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच दीपिका-रणवीरने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली. गरोदरपणात दीपिका स्वत:ला जास्तीत जास्त वेळ देत आहे. त्याबरोबरच ती राहिलेलं शूटिंगही पूर्ण करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिकाला 'सिंघम अगेन'च्या सेटवर स्पॉट करण्यात आलं होतं. आता पुन्हा तिचा सेटवरील फोटो समोर आला आहे.
चार महिन्यांची गरोदर असलेली दीपिका 'सिंघम अगेन' सिनेमामध्ये अॅक्शन सीन्स करताना दिसणार आहे. या सिनेमात ती महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच 'सिंघम'च्या सेटवर तिला पोलिसाच्या वेशात शूटिंग करताना स्पॉट केलं गेलं होतं. या फोटोंमध्ये दीपिकाचा बेबी बंपही दिसला होता. आता दीपिकाचा ज्युनिअर आर्टिस्टबरोबरचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दीपिका ज्युनिअर आर्टिस्टबरोबर दिसत आहे. फोटोमध्ये दीपिकाच्या चेहऱ्यावर प्रेग्नंन्सी ग्लोदेखील स्पष्ट दिसत आहे.
ज्युनिअर आर्टिस्टने दीपिकासाठी खास पोस्टही लिहिली आहे. दीपिकाबरोबरच्या फोटोंसोबतच अभिनेत्रीचं एक स्केचही दिसत आहे. "आमच्या हिरोसाठी, लेडी सिंघम", असं लिहिलेली नोटही फोटोत दिसत आहे.
दरम्यान, दीपिका आणि रणवीरने २०१८ मध्ये लग्नाच्या बेडीत अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नानंतर ६ वर्षांनी त्यांना चिमुकल्याची चाहुल लागली आहे. आईबाबा होण्यासाठी दीपिका आणि रणवीर उत्सुक आहेत. सप्टेंबर महिन्यात दीपिका-रणवीरच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.