कॅटरिना कैफचा व्हिडिओ पाहून दीपिका पादुकोण म्हणाली, ‘कोई तो रोक लो....’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 19:00 IST2019-02-03T19:00:00+5:302019-02-03T19:00:02+5:30

कॅटरिना व दीपिका यांच्यातील ‘कोल्ड वॉर’ कुणापासूनही लपून राहिले नाही. पण आता मात्र बरेच काही बदललेले दिसतेय.

Deepika Padukone Leaves A Comment On Katrina Kaif's Instagram Post | कॅटरिना कैफचा व्हिडिओ पाहून दीपिका पादुकोण म्हणाली, ‘कोई तो रोक लो....’!!

कॅटरिना कैफचा व्हिडिओ पाहून दीपिका पादुकोण म्हणाली, ‘कोई तो रोक लो....’!!

ठळक मुद्देदोघींनीही ब्रेकअपचे दु:ख भोगले. कदाचित हाच समान धागा त्यांना जवळ घेऊन आलाय...

दीपिका पादुकोण व कॅटरिना कैफ यांच्यातील रिलेशन प्रत्येक सिनेप्रेमीला ठाऊक आहे. एकेकाळी या दोघींमधील ‘कोल्ड वॉर’ चर्चेचा विषय बनला होता आणि याचा कारण होते, रणबीर कपूर. होय, ऐकेकाळी दीपिका रणबीरच्या प्रेमात आकंठ बुडाली असताना रणबीरच्या आयुष्यात कॅटरिना नावाचे वादळ आले आणि दीपिकाचे आयुष्य अस्तव्यस्त करून गेले. यानंतर कॅटरिना व दीपिका यांच्यातील ‘कोल्ड वॉर’ कुणापासूनही लपून राहिले नाही. पण आता मात्र बरेच काही बदललेले दिसतेय. होय, हे आम्ही नाही तर दोघींचे सोशल अकाऊंट सांगतेय.


अलीकडे कॅटरिनाने आपला एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. यात कॅट लाल रंगाच्या ड्रेसमध्ये जलवा दाखवतेय. कॅटच्या या व्हिडिओवर लाखो लोकांनी कमेंट्स केल्या. पण यातील एका कमेंटने सगळ्यांचे लक्ष वेधले. ही कमेंट कुणाची तर दीपिका पादुकोणची.

होय, कॅटच्या या व्हिडिओवर दीपिकाने ‘कोई तो रोक लो....’, अशी कमेंट केली. या कमेंटवरून एक गोष्ट स्पष्ट होतेय, ती म्हणजे, ‘कोल्ड वॉर’संपलेय आणि कॅट व दीपिका दोघीही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी बनल्या आहेत. दोघींच्याही आयुष्यातून रणबीर कायमचा ‘डिलीट’ झाला, कदाचित हेही त्याचे कारण असावे.
दीपिकाला सोडून रणबीर कॅटकडे गेला खरा. पण तिथेही तो फार काळ रमू शकला नाही. काहीच महिन्यात त्याचे व कॅटचे ब्रेकअप झाले. रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दीपिकाने रणवीर सिंगसोबत लग्न केले तर कॅट आपल्या करिअरमध्ये बिझी झाली. पण दोघींनीही ब्रेकअपचे दु:ख भोगले. कदाचित हाच समान धागा त्यांना जवळ घेऊन आलाय...

Web Title: Deepika Padukone Leaves A Comment On Katrina Kaif's Instagram Post