आता लग्नानंतर दीपिका पादुकोण रणवीर सिंगला प्रेमाने 'या' नावाने देते आवाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 17:39 IST2019-01-28T17:33:52+5:302019-01-28T17:39:48+5:30
रणवीर सिंगने नुकतेच उमंग अवॉर्ड शोमध्ये टायगर प्रिंट ड्रेस घालून हजेरी लावत सगळ्यांचे लक्ष वेधले. सोशल मीडियावर त्याचे फोटो चांगलेच व्हायरल होतायेत.

आता लग्नानंतर दीपिका पादुकोण रणवीर सिंगला प्रेमाने 'या' नावाने देते आवाज
रणवीर सिंगने नुकतेच उमंग अवॉर्ड शोमध्ये टायगर प्रिंट ड्रेस घालून हजेरी लावत सगळ्यांचे लक्ष वेधले. सोशल मीडियावर त्याचे फोटो चांगलेच व्हायरल होतायेत. या सोहळ्यात रणवीरसोबत अजय देवगण आणि रोहित शेट्टीसुद्धा उपस्थित होता. यावेळी रणवीरने 'सिम्बा' सिनेमाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमासाठी त्यांचे आभार मानले तसेच दीपिका पादुकोण त्याला घरी काय नावाने आवाज देते याचा खुलासा केला.
— Ranveer Singh (@RanveerOfficial) 27 January 2019
गतवर्षी दीपिका-रणवीर लग्नाच्या बंधनात अडकले. लग्नाला 3 महिने उलटून गेल्यावरी देखील ही जोडी कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. उमंग अवॉर्ड शोदरम्यान रणवीरने सांगितले की दीपिका त्याला घरात ''आया पोलीस'' म्हणून आवाज देते. हे ऐकातच उपस्थित प्रेक्षकांनामध्ये एकच हास्यकल्लोळ झाला.
रणवीर सिंग स्टारर ‘सिम्बा’ने ‘छप्परफाड’ कमाई केली आहे. ओपनिंग डेवर २०.७२ कोटीची कमाई करून समीक्षक व प्रेक्षक दोन्हींची मने जिंकणारा ‘सिम्बा’ने १०० कोटी क्लबमध्ये कधीच एन्ट्री मिळवली आणि बघता बघता २०० कोटींचा आकडाही पार केला. ‘सिम्बा’ने रणवीरच्याच ‘बाजीराव मस्तानी’चा रेकॉर्ड तोडला. होय, ‘सिम्बा’ नऊ दिवसांत ‘बाजीराव मस्तानी’हून अधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. रणवीरच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाने भारतात १८४ कोटींची कमाई केली होती. तर जगभरात ३५८ कोटींचा गल्ला जमवला होता.