हेटरने शिवी घातली, दीपिका पादुकोणची सटकली; असे दिले उत्तर की, त्याची बोलती बंद झाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 16:00 IST2021-02-14T16:00:00+5:302021-02-14T16:00:03+5:30
सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असलेली दीपिका अलीकडे कुठल्याशा मुद्यावरून ट्रोल झाली. या ट्रोलरने केवळ ट्रोल केले नाही तर दीपिकाला अगदी थेट मॅसेज करून शिव्या घातल्या.

हेटरने शिवी घातली, दीपिका पादुकोणची सटकली; असे दिले उत्तर की, त्याची बोलती बंद झाली
ट्रोल होणे सेलिब्रिटींसाठी नवे नाही. या ना त्या कारणाने बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर ट्रोल होतात. अर्थात अनेकजण या ट्रोलर्सला जशास तसे उत्तरही देतात. दीपिका पादुकोण त्यापैकीच एक.
सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असलेली दीपिका अलीकडे कुठल्याशा मुद्यावरून ट्रोल झाली. या ट्रोलरने केवळ ट्रोल केले नाही तर दीपिकाला अगदी थेट मॅसेज करून शिव्या घातल्या. अशा शिव्या पाहून कोणाचीही सटकेल. दीपिकाचीही सटकली आणि शिव्या घालणा-या या हेटरला तिने सणसणीत उत्तर दिले. अर्थात तिततक्याच विनम्र शब्दांत.
दीपिकाने या ट्रोलरच्या मॅसेजचा स्क्रिनशॉट शेअर केला. ‘वाह, तुझे कुटुंब व तुझ्या मित्रांना तुझा किती अभिमान वाटत असेन,’ असे तिने लिहिले. दीपिकाच्या या उत्तराने त्या ट्रोलरची बोलती बंद झाली नसेन तर नवल. दीपिकाने ज्या ट्रोलरला सुनावले, त्याचे नाव साहिल शाह आहे आणि तो महाराष्ट्राचा आहे.
दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायवे तर यावर्षी दीपिकाचे एक-दोन नव्हे तर अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यावर्षी दीपिका बाहुबली फेम प्रभाससोबतही दिसणार आहे. ऋतिक रोशनसोबत ‘फायटर’ या चित्रपटातही ती झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. याव्यतिरिक्त दीपिका, शाहरुख खानसोबत ‘पठान’ या चित्रपटात धमाका करणार आहे. याशिवाय शकुन बत्राचा एक सिनेमाही तिने हातावेगळा केला आहे.