दीपिका पादुकोणने रणवीर सिंगसोबत केला Wrek Dance, हसून हसून लोटपोट झालेत फॅन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 11:04 IST2021-03-11T11:03:23+5:302021-03-11T11:04:16+5:30

व्हिडीओ इतका मजेदार आहे की, पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

deepika padukone and ranveer singh dance on werk it baby | दीपिका पादुकोणने रणवीर सिंगसोबत केला Wrek Dance, हसून हसून लोटपोट झालेत फॅन्स

दीपिका पादुकोणने रणवीर सिंगसोबत केला Wrek Dance, हसून हसून लोटपोट झालेत फॅन्स

ठळक मुद्देदीपिका आणि रणवीरच्या या फनी व्हिडीओला काहीच तासांत 11 लाखांवर लाईक्स मिळाले आहेत. चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी दोघांना हटके कमेंट केल्या आहेत. 

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग हे बॉलिवूडचे लोकप्रिय कपल.  रिअ असो की रिअल या कपलची केमिस्ट्री प्रेक्षकांना वेड लावते. तूर्तास या कपलचा एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर धूम करतोय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

दीपिकाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत दीपिका व रणवीर दोघेही Werk it baby या गाण्यावर फनी डान्स करताना दिसत आहेत. व्हिडीओ इतका मजेदार आहे की, पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

व्हिडीओत कलफूल नाईट सूट आणि डोक्यावर हॅट घातलेली दीपिका डान्स करते. पाठोपाठ रणवीरही तिच्यासोबत डान्स करु लागतो.  रणवीर डान्स करत असतनाच दीपिका त्याला धक्का देते आणि खाली पाडून स्वत: नाचू लागते. यावेळी रणवीरच्या चेह-यावर जे भाव उमटतात, ते तुम्ही पाहायलाच हवेत. ‘Werk it baby’ असे कॅप्शन देत दीपिकाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच तिने ‘#bussitchallenge’ चॅलेंजही ट्रेंड केले आहे.
दीपिका आणि रणवीरच्या या फनी व्हिडीओला काहीच तासांत 11 लाखांवर लाईक्स मिळाले आहेत. चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी दोघांना हटके कमेंट केल्या आहेत. 

दीपवीर लवकरच ‘83’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 1983 सालात भारताने जिंकलेल्या विश्वचषकाची विजयगाथा या सिनेमात पाहायला मिळणार आहे. रणवीर या विश्वचषकाचे कप्तान कपिल देव यांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर दीपिका कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.

Web Title: deepika padukone and ranveer singh dance on werk it baby