ख्रिसमसच्या दिवशी रोमँटिक मूडमध्ये दिसले दीपवीर, पहा त्यांचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 20:13 IST2019-12-25T20:12:34+5:302019-12-25T20:13:14+5:30
बॉलिवूडचे लोकप्रिय कपल दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांनी रोमँटिक फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.

ख्रिसमसच्या दिवशी रोमँटिक मूडमध्ये दिसले दीपवीर, पहा त्यांचे फोटो
आज जगभरात ख्रिसमस साजरा करण्यात आला. लोकांनी आपल्या निकटवर्तीयांना व कुटुंबातील लोकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. या दरम्यान बॉलिवूडचे लोकप्रिय कपल दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांनी रोमँटिक फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे बॉलिवूड कपल सर्वांचे फेवरेट कपल आहे. दोघांचीही ऑन स्क्रिन आणि ऑफ स्क्रिन केमिस्ट्रीला तोड नाही. ते दोघंही सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि ते एकमेकांच्या फोटोंवर कमेंट्स करताना दिसत असतात. मात्र आता त्यांनी त्या दोघांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रोमँटिक अंदाजातील फोटो शेअर करत ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दीपिकाने रणवीर सोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, आमच्याकडून ख्रिसमसच्या शुभेच्छा. ख्रिसमस ट्री डेकोरेट करण्यासाठी दीपिका अँड कंपनीसोबत संपर्क करा.
तर रणवीर सिंगने दीपिकासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, या ख्रिसमसला मला जे हवं आहे ते सर्व.
रणवीर व दीपिकाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे तर दोघेही लवकरच ‘83’ या सिनेमात एकत्र झळकणार आहेत. ‘83’ हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. या सिनेमात दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांच्या भूमिका साकारणार आहे.
लग्नानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचा हा पहिला सिनेमा आहे. याशिवाय दीपिका ‘छपाक’ या सिनेमात दिसणार आहे.