दीपिकाने पती रणवीरला लग्नानंतर 'या' ३ गोष्टी करण्यास घातलीये बंदी; 'धुरंधर' अभिनेत्याचा खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 16:12 IST2026-01-14T16:10:06+5:302026-01-14T16:12:08+5:30
बाहेर कितीही 'धुरंधर' असला तरी घरात मात्र दीपिकाचीच चालते! रणवीरला 'या' ३ गोष्टी करण्यास आहे सक्त बंदी

दीपिकाने पती रणवीरला लग्नानंतर 'या' ३ गोष्टी करण्यास घातलीये बंदी; 'धुरंधर' अभिनेत्याचा खुलासा!
बॉलिवूडचा 'धुरंधर' अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमुळे चर्चेत आहे. रणवीरच्या 'धुरंधर' सिनेमाने केवळ भारतात नाही तर जगभरात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. रणवीरने केवळ मोठे बॉक्स ऑफिस यश मिळवले नाही, तर भारतीय सिनेमाच्या जागतिक प्रभावात एक नवे पर्वही जोडले आहे. अशातच रणवीरच्या वैयक्तिक आयुष्यातील काही खास गोष्टी समोर आल्या आहेत. दीपिका पादुकोणने लग्नानंतर रणवीरवर काही खास नियम लादल्याचा खुलासा त्यानेच केला आहे.
रणवीरने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं की, तो लग्नानंतर ३ गोष्टी अजिबात करू शकत नाही. रणवीर आता बॅचलरसारखा खूप उशिरापर्यंत मित्रांसोबत बाहेर फिरू शकत नाही, त्याला वेळेत घरी परतावे लागते. दीपिकाने त्याला सक्त ताकीद दिली आहे की, घराबाहेर जाण्यापूर्वी त्याने नेहमी जेवण करूनच निघावे. तसेच रणवीर कुठेही शूटिंग करत असला किंवा कितीही व्यस्त असला, तरी त्याला दीपिकाचा फोन उचलावाच लागतो. तो तिचा फोन टाळू शकत नाही.
रणवीर मोठ्या अभिमानाने म्हणाला, "किती प्रेमळ ही बंधनं आहेत. मी आता एका शिस्तबद्ध संसारात आहे. वेळेत उठणे, वेळेत जेवणे आणि कामावरून वेळेत घरी परतणे या सगळ्या गोष्टी मी आता पाळतोय. माझ्या आयुष्यात घडलेली ही सर्वोत्तम गोष्ट आहे".
रणवीरचा यशस्वी प्रवास
२०१० मध्ये 'बँड बाजा बारात'मधून पदार्पण करणाऱ्या रणवीरने 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत', 'गली बॉय' आणि आता 'धुरंधर' सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी विवाहबंधनात अडकलेल्या या जोडीचा आजही तितकाच दरारा बॉलिवूडमध्ये पाहायला मिळतो.