दीपवीरच्या चाहत्यांसाठी खुशखबर...! रणवीर सिंग व दीपिका पादुकोण झळकणार हॅप्पी एण्डिंगसोबत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 19:12 IST2019-05-14T19:11:41+5:302019-05-14T19:12:12+5:30
अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच एका चित्रपटात पहायला मिळणार आहेत.

दीपवीरच्या चाहत्यांसाठी खुशखबर...! रणवीर सिंग व दीपिका पादुकोण झळकणार हॅप्पी एण्डिंगसोबत?
गोलियों की रासलीला-रामलीला, पद्मावत व बाजीराव मस्तानी या चित्रपटात दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांनी एकत्र काम करून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. मात्र आतापर्यंत त्यांनी अशा एकाही चित्रपटात एकत्र काम केले नाही ज्यात हॅप्पी एण्डिंग होईल. बाजीराव मस्तानीमध्ये बाजीराव व मस्तानी दोघेही मरतात. तर पद्मावत व रामलीलामध्येदेखील शेवट असाच आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता प्रेक्षकांची तक्रार दूर होणार आहे आणि आता हे दोघे एकत्र झळकणार आणि हॅप्पी एण्डिंगही पहायला मिळणार आहे.
आज तकच्या रिपोर्टनुसार दीपिका पादुकोणलारणवीर सिंगचा आगामी चित्रपट ८३ साठी फायनल केले आहे.
हा चित्रपट भारताच्या पहिल्या क्रिकेट विश्वचषकची कथा सांगणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग कपिल देवची भूमिका साकारणार आहे आणि दीपिका यात कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे. इतकेच नाही तर दीपिका या चित्रपटाची निर्मातीदेखील असणार असल्याचे समजते आहे.
या वृत्तानंतर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. कुणी म्हणतंय की दीपिका ८३मध्ये पाहुणी कलाकार म्हणून दिसेल. पिंकव्हिलाच्या रिपोर्टमध्ये सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपिकाचा या चित्रपटात चांगला रोल असणार आहे. कारण ती चित्रपटात कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. कथेत असाही एक सीन असणार आहे ज्यात भारताचे विकेट पडू लागतात आणि ती स्टेडिअममधून निघून जाते.
सूत्रांच्या माहितीनुसार ती परत येते जेव्हा भारत हा सामना जिंकू लागतो. हा खूप ड्रामेटिक सीन आहे. या चित्रपटात लवस्टोरीदेखील पहायला मिळणार आहे.
दीपिका पादुकोण सध्या छपाक चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तर सध्या ती कान्स फेस्टिव्हलसाठी न्यूयॉर्कमध्ये आहे.