‘दीप-वीर’चे कोंकणी पद्धतीने शुभमंगल, आता समद्या देशाला झालीया लग्नाच्या फोटोची घाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 06:22 IST2018-11-15T06:05:28+5:302018-11-15T06:22:32+5:30

बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.

Deepa-Veer's 'Shubhamangal' in Konkani mode, hurriedly shot photos | ‘दीप-वीर’चे कोंकणी पद्धतीने शुभमंगल, आता समद्या देशाला झालीया लग्नाच्या फोटोची घाई

‘दीप-वीर’चे कोंकणी पद्धतीने शुभमंगल, आता समद्या देशाला झालीया लग्नाच्या फोटोची घाई

रोम : बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. इटलीतील लेक कोमोच्या काठावर असलेल्या ‘विला डेल बालबिअ‍ॅनेलो’ या निसर्गरम्य रिसॉर्टमध्ये ‘दीपवीर’चा शाही विवाहसोहळा पारंपरिक कोंकणी पद्धतीने पार पडला. या दोन्ही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लग्नाची सर्वच चाहत्यांना उत्सुकता लागली होती. अखेर, बुधवारी इटली या दोघांनी आपली जीवनगाठ बांधली. 

दीपिकाला आवडणाऱ्या वॉटर लिलीच्या फुलांनी लग्नाचा मंडप सजवण्यात आला होता. मंत्रोच्चाराचे आवाज विलाच्या बाहेरही ऐकू येत होते. अद्याप दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर आलेले नाहीत. या विवाह सोहळ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. रणवीर-दीपिकाचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र असे फक्त ४० जणच या लग्नाला उपस्थित होते, असे समजते. दरम्यान, दिपीका अन् रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची उत्सुकता केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनाही लागून राहिली आहे. इराणी यांनी आपल्या इंस्टा अकाऊंटवरुन एक फोटो शेअर करत, देशातील सर्वांनाच दीप-वीरच्या लग्नाच्या अधिकृत घोषणेची आणि फोटोंची उत्सुकता असल्याचे म्हटलंय. 


Web Title: Deepa-Veer's 'Shubhamangal' in Konkani mode, hurriedly shot photos