Koffee With Karan 7: काय सांगता? गौरी खानला आहे ‘ही’ वाईट सवय...!  लेक सुहानानेच केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 02:13 PM2022-09-23T14:13:24+5:302022-09-23T14:14:29+5:30

Koffee With Karan 7, Suhana Khan: सुहाना खाननेच सगळ्यांसमोर सांगितलं आईचं सीक्रेट, वाचून तुम्हीही व्हाल थक्क.....

daughter Suhana Khan reveal secret of mother Gauri Khan everyone was shocked | Koffee With Karan 7: काय सांगता? गौरी खानला आहे ‘ही’ वाईट सवय...!  लेक सुहानानेच केली पोलखोल

Koffee With Karan 7: काय सांगता? गौरी खानला आहे ‘ही’ वाईट सवय...!  लेक सुहानानेच केली पोलखोल

googlenewsNext

‘कॉफी विद करण 7’च्या (Koffee With Karan 7) नव्या एपिसोडमध्ये गौरी खान (Gauri Khan ), महिप कपूर, भावना पांडे अशा तिघीही सामील झाल्यात. गौरी, महिप आणि भावना या तिघींची 25 वर्षांपासूनची  मैत्री आहे. त्यांच्या मुली सुहाना खान, शनाया कपूर व अनन्या पांडे या तिघीही बेस्ट फ्रेन्ड आहेत. ‘कॉफी विद करण 7’ या तिघींनीही आपल्या आईची पोलखोल करण्याचा निर्णय घेतला. अनन्या व शनाया कपूरने व्हिडीओच्या माध्यमातून आपआपल्या आईची पोलखोल केली. मग सुहाना (Suhana Khan) कशी मागे राहणार? तिनेही आईची पोलखोल केलीच.
कॉन्ट्रक्ट साईन केला असल्याने सुहाना व्हिडीओत दिसली नाही. पण तिची ऑडिओ क्लिप ‘कॉफी विद करण 7’मध्ये प्ले करण्यात आली. यात तिने आई गौरीचे अनेक सीक्रेट शेअर केलेत.

आईची वाईट सवय...
सुहाना खानची आई गौरी खानला एक वाईट सवय आहे. होय, खुद्द लेकीनेच तिची पोलखोल केली. तिने सांगितलं, माझी आई गौरी खान ब्रिटीश एअरवेज किंवा जेट एअरवेजमध्ये मिळालेला पायजमा घरी आणते. इतकंच नव्हे तर हा पायजमा ती घालते देखील. खासकरून रात्री झोपताना तिला असे कपडे परिधान करणं आवडतं. गौरीचं हे सीक्रेट ऐकून करण जोहर देखील आश्चर्यचकित झाला.

तिच्या पोटात कुठलीच गोष्ट पचत नाही...
होय, गौरी खानच्या पोटात कुठलीच गोष्ट पचत नाही. सुहानाने त्याबद्दलही सांगितलं. ती म्हणाली, ‘माझ्या आईला सगळ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. पण तिच्या पोटात एकही गोष्ट पचत नाही. एकदा मी तिला फोनवर एक सीक्रेट सांगत होते. आई, हे तू कुणालाही सांगणार नाहीस, असं मी तिला म्हणाले. फोन स्पीकरवर होता आणि अबरामने आमचं बोलणं ऐकलं. आई हे सर्वांना सांगणार, असं तो लगेच म्हणाला. आईला कोणतीच गोष्ट सीक्रेट ठेऊ शकत नाही. 9 वर्षाच्या अबरामलाही हे कळलं आहे.  एखादी गोष्ट कोणालाच सांगायची नाही हे तिला 500 वेळा जरी सांगितलं तरी ती सगळ्यांना सांगते. माझी आईदेखील इतर आईंप्रमाणेच आहे.’

तिला अनोळखी लोकांसोबत बोलणं अजिबात आवडत नाही....
होय, गौरीला अनोळखी लोकांसोबत बोलणं अजिबात आवडत नाही. याचाही खुलासा तिच्या लेकीनेच केला. सुहानाने सांगितलं, ‘आई व्हॅकेशनवर असते तेव्हा तिला कोणाशीच बोलायला आवडत नाही. एकदा लंडनमध्ये तिला कुणीतरी रस्ता विचारला. तर जणू इंग्रजी समजत नाही, असं दाखवून आईने त्या पत्ता विचारणाऱ्याशी बोलणं टाळलं.   सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये तिला बोलायला आवडत नाही.’

Web Title: daughter Suhana Khan reveal secret of mother Gauri Khan everyone was shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.