सलमान खान चुलबुल पांडेचा लूक शेअर करत म्हणाला, स्वागत तो करो हमारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 14:43 IST2019-09-11T14:40:29+5:302019-09-11T14:43:07+5:30
दबंग 3 ची घोषणा झाल्यापासून सलमान खानचा हा सिनेमा सतत चर्चेत आहे. कधी सिनेमाच्या रिलीज डेटला घेऊन तर कधी सेटवरील किस्स्यांना घेऊन चर्चेत असतो.

सलमान खान चुलबुल पांडेचा लूक शेअर करत म्हणाला, स्वागत तो करो हमारा
दबंग 3 ची घोषणा झाल्यापासून सलमान खानचा हा सिनेमा सतत चर्चेत आहे. कधी सिनेमाच्या रिलीज डेटला घेऊन तर कधी सेटवरील किस्स्यांना घेऊन चर्चेत असतो. नुकताच सलमानच्या या सिनेमाचा टीजर शेअर केला आहे आणि 100 दिवसांमध्ये चुलबुल पांडे तुमच्या भेटीला येत असल्याची माहिती आपल्या फॅन्सना दिली आहे.
टीझर शेअर करताना सलमान खानने लिहिले की, रॉबिनहुड पांडे येतोय तुमच्या भेटीला स्वागत नाही करणार त्याचे. सलमान खानचा हा टीझर वेगवेगळ्या भाषेत रिलीज करण्यात आला आहे.
'दबंग 3' 20 डिसेंबर 2019ला रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच कन्नड, तमीळ आणि तेलुगू भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल सलमानच्या फॅन्सना प्रचंड उत्सुकता आहे.
'दबंग 2’ या चित्रपटातील पोलिस ऑफिसर चुलबुल पांडे प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. पोलिस ऑफिसर बनण्यापूर्वी चुलबुल कसा होता हे प्रेक्षकांना ‘दबंग 3’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात चुलबुल पांडेचे वय ‘दबंग’ आणि ‘दबंग 2’ या दोन्ही चित्रपटांपेक्षा कमी असल्याने सलमान सध्या या चित्रपटासाठी वजन कमी करत आहे. या सिनेमात सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा दिसणार आहे. तसेच साऊथचा प्रसिद्ध अभिनेता किचा सुदीप व्हिलेनच्या भूमिकेत दिसणार आहे. तर याच सिनेमातून महेश मांजरेकरची मुलगी सई मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे.