नोरा फतेहीचा हा व्हिडीओ करेल तुम्हाला रिफ्रेश,एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 19:08 IST2020-03-25T19:06:08+5:302020-03-25T19:08:31+5:30
आपल्या डान्सच्या माध्यमातून नोरा फतेहीने रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. नोराने ''स्ट्रीट डान्सर थ्रीडी' मध्ये नुकताच आपला जलवा दाखवला.

नोरा फतेहीचा हा व्हिडीओ करेल तुम्हाला रिफ्रेश,एकदा पाहाच
नोरा फतेहीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात व्हिडीओत ती एका चिमुकलीसह डान्स करताना पाहायला मिळत आहे. यांत चिमुकली देखील नोरा जसे सांगते तसे अगदी डान्स करत असल्याचे पाहायला मिळतंय.सध्या या चिमुकलीसह तिचा व्हिडीओस सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटीझन्सनाही थोडा वेळ रिफ्रेश वाटेल हे मात्र नक्की. अर्थात हा व्हिडीओ जुना असला तरी क्वॉरंटाईन टाईममध्ये तो व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला नोराच्या चाहत्यांनी भरघोस प्रतिसादस देत तुफान पसती दर्शवली असल्याचे पाहायला मिळत आहे.
बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी नोराला खूप संघर्ष करावा लागला. स्ट्रगलिंगच्या दिवसांत नोरा PG म्हणून राहायची. त्यावेळी तिला हिंदी बोलता येत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिच्यावर अनेक वेळा वाईट कमेंट्स केल्या जायच्या. शाळेत असताना थट्टा केली जायची कारण तिला त्यावेळी डान्स करायला यायचा नाही. मात्र आज डान्ससाठी नोरा प्रत्येक निर्मात्याची पहिली चॉईस बनली आहे.
आपल्या डान्सच्या माध्यमातून नोरा फतेहीने रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. नोराने ''स्ट्रीट डान्सर थ्रीडी' मध्ये नुकताच आपला जलवा दाखवला. या सिनेमात तिने केलेल्या डान्स सगळीकडेच कौतूक झाले. सत्यमेव जयतेमधील 'दिलबर' गाण्यामुळे घराघरात पोहोचली आहे. आज आम्ही तुम्हाला नोराच्या आयुष्यातील काही माहित नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत. नोराने कधी वेटर तर कधी लॉटरी विकायचे काम केले आहे.