ख्रिस्तियानो रोनाल्डोनं बिपाशा बासूला केलं होतं सर्वांसमोर Kiss, फोटो पाहून तुम्हाला बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 11:18 IST2024-12-18T11:17:59+5:302024-12-18T11:18:27+5:30

बिपाशा आणि ख्रिस्तियानो यांचा किस करताना फोटो व्हायरल झाल्यानंतर ते दोघे डेट करत असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. 

Cristiano Ronaldo And Bipasha Basu Old Kissing Pictures went Viral | ख्रिस्तियानो रोनाल्डोनं बिपाशा बासूला केलं होतं सर्वांसमोर Kiss, फोटो पाहून तुम्हाला बसेल धक्का!

ख्रिस्तियानो रोनाल्डोनं बिपाशा बासूला केलं होतं सर्वांसमोर Kiss, फोटो पाहून तुम्हाला बसेल धक्का!

Bipasha Basu Picture Kissing Cristiano Ronaldo : अभिनेत्री बिपाशा बासूचा (Bipasha Basu) एक जुना फोटो पुन्हा एकदा इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला (Cristiano Ronaldo) किस करताना दिसत आहे. हा फोटो 2007 सालचा आहे. हा फोटो पाहून तुम्हाला नक्की धक्का बसेल. ख्रिस्तियानो रोनाल्डो हे फुटबॉल जगतातील मोठे नाव आहे. करोडो फुटबॉल चाहत्यांचा मनात आपलं स्थान निर्माण केलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो आज जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. फुटबॉलमुळं जेवढी चर्चा रोनाल्डोची होते. तेवढीच चर्चा त्याच्या अफेअर्सबद्दलही होते.  बिपाशा आणि ख्रिस्तियानो यांचा किस करताना फोटो व्हायरल झाल्यानंतर ते दोघे डेट करत असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. 

बिपाशा आणि रोनाल्डो यांची एका पोर्तुगालमध्ये एका पार्टीत ओळख झाली. त्याच पार्टीत रोनाल्डोनं बिपाशाचं कीस घेतलं होतं. ते दोघे डेट करत असल्याची चर्चाही रंगली होती. डेटिंगच्या चर्चावर बिपाशाने म्हटलं होतं की, "त्याला भेटणे हे एक मोठे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे. कार्यक्रमानंतर आम्ही क्लबिंगला गेलो. तो आता माझा मित्र आहे आणि त्याने मला वचन दिले होते की तो त्याच्या प्रत्येक सामन्यासाठी मला कॉल करेल".

ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि बिपाशा यांची ओळख झाली, तेव्हा बिपाशा ही जॉनला डेट करत होती. बॉलिवूड वेडिंगच्या रिपोर्टनुसार, ख्रिस्तियानो  रोनाल्डो आणि बिपाशा इतके जवळ आले होते की त्याचा जॉनसोबतच्या नातेसंबंधावर परिणाम झाला होता. बिपाशानं 'अजनबी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि यासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. यानंतर बिपाशाची कारकीर्द उंचीवर पोहोचली. बिपाशाने जॉन अब्राहमसोबत 'जिस्म' या चित्रपटात काम केलं होतं आणि याच काळात ते दोघे प्रेमात पडले होते.  बिपाशा बसू आणि जॉन गंभीर रिलेशनशिपमध्ये होते, परंतु ते दोघे 2011 मध्ये वेगळे झाले. दरम्यान,  बिपाशाने करण ग्रोवरशी लग्न केलं आणि आता दोघांना एक मुलगी आहे.

Web Title: Cristiano Ronaldo And Bipasha Basu Old Kissing Pictures went Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.