Crime News: सावरकरांवर बोललीस तर खबरदार! स्वरा भास्करला जिवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 16:00 IST2022-06-30T16:00:05+5:302022-06-30T16:00:29+5:30
Crime News: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना धमक्या मिळत आहेत. दरम्यान, आता स्वरा भास्कर हिला जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

Crime News: सावरकरांवर बोललीस तर खबरदार! स्वरा भास्करला जिवे मारण्याची धमकी
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना धमक्या मिळत आहेत. दरम्यान, आता स्वरा भास्कर हिला जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने स्वरा भास्करला ही धमकी दिली आहे. हे धमकीचं पत्र स्वरा भास्करच्या घरी स्पीड पोस्टच्या माध्यमातून पाठवण्यात आलं आहे.
स्वरा भास्करने २८ जून रोजी वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेत ही तक्रार दिली आहे. एका अनोळखी व्यक्तीने गेल्या आठवड्यात पत्र पाठवून आपल्याला ही धमकी दिल्याचे स्वरा भास्कर हिने म्हटले आहे. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही. तू फक्त तुझ्या चित्रपटांवर लक्ष दे, असं सांगून या पत्रातून शिविगाळ करून धमकी देण्यात आल्याचे स्वराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत कलम ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
स्वरा भास्करने अनेकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. तसेच देशातील विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर ती नेहमीच आपलं मत मांडत असते.