'खिचडी 2' मध्ये भन्नाट कॉमेडी; 'हंसा भाभी' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 03:30 PM2023-10-01T15:30:41+5:302023-10-01T15:33:02+5:30

यंदाच्या दिवाळीत  १७ नोव्हेंबरला 'हंसा भाभी' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Crazy comedy in 'Khichdi 2'; 'Hansa Bhabhi' again meets the audience | 'खिचडी 2' मध्ये भन्नाट कॉमेडी; 'हंसा भाभी' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

Khichdi

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'खिचडी'ची आजही प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा आहे. खिचडी या टीव्ही मालिकेपासून प्रेरित असलेला खिचडी हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. आता 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या 13 वर्षानंतर 'खिचडी 2' हा चित्रपट येतोय. यंदाच्या दिवाळीत  १७ नोव्हेंबरला 'हंसा भाभी' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाचा मजेशीर टीझर रिलीज झाला आहे.

टीझरमध्ये पारेख कुटुंबाच्या गुप्त मिशनची झलक दिसते, ज्यासाठी ते सर्वजण पंथुकिस्तानला जात आहेत. हंसा, बाबूजी, प्रफुल, हिमांशू यांची कॉमेडी टीझरमध्ये पाहायला मिळते. तर हंसा आणि प्रफुलचे विचित्र प्रश्न आणि त्यावर बाबूजींची हटके प्रतिक्रिया दिसते.या विनोदी चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक आशिष कपाडिया असून हॅट्स ऑफ प्रॉडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

 टीझर प्रदर्शित होताचचाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट केली की, "हा चित्रपट पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे". तर दुसर्‍याने लिहिले, "छान आहे, पण टायगर 3 सोबत संघर्ष टाळण्यासाठी दुसरी तारीख निवडायला हवी होती".

'खिचडी' हा एकमेव भारतीय सिटकॉम आहे, ज्यावर चित्रपट तयार केला होता.  'खिचडी' मालिकेचे 98 भाग असून सुमारे 2 वर्षे टीव्हीवर सुरू होती. ही मालिका मुंबईत राहणाऱ्या गुजराती कुटुंबाच्या जीवनावर आधारित आहे. याशिवाय 2005 मध्ये झटपट खिचडी हा 38 भागांचा शो देखील प्रसारित झाला होता. 2018 मध्ये खिचडी रिटर्न्स हा 23 भागांचा शो देखील आला होता.

Web Title: Crazy comedy in 'Khichdi 2'; 'Hansa Bhabhi' again meets the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.