Crazxy Movie: 'तुंबाड'नंतर सोहम शाह यांच्या नव्या सिनेमाचं पहिलं पोस्टर, कधी रिलीज होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 15:57 IST2025-02-04T15:56:43+5:302025-02-04T15:57:27+5:30
तुंबाडसारखा यशस्वी प्रयोग करणाऱ्या सोहम शाह यांनी त्यांच्या नव्या सिनेमाची घोषणा आज केलीय (sohum shah, crazxy movie)

Crazxy Movie: 'तुंबाड'नंतर सोहम शाह यांच्या नव्या सिनेमाचं पहिलं पोस्टर, कधी रिलीज होणार?
'तुंबाड' (tumbbad) सिनेमा २०१८ ला रिलीज झाला. प्रेक्षक आणि समीक्षकांनी सिनेमाला खूप प्रेम दिलं. इतकंच नव्हे 'तुंबाड' सिनेमा २०२४ मध्ये पुन्हा रिलीज झाला तेव्हा अनपेक्षितरित्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. 'तुंबाड' ज्यांनी बनवला ते निर्माते आणि प्रमुख अभिनेते सोहम शाह (sohum shah) यांच्या नवीन सिनेमाचं पहिलं पोस्टर आज रिलीज झालंय. Crazxy असं या सिनेमाचं भन्नाट नाव आहे.
सोहम शाह यांचा नवीन सिनेमा
सोहम शाह यांनी नुकतंच सोशल मीडियावर Crazxy सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर केलंय. या पोस्टरमध्ये सोहम शाह सुटाबुटात दिसत असून त्यांच्या खांद्यावर पैशांनी भरलेली बॅग पाहायला मिळतेय. या बॅगेतून काही पैसे सांडताना दिसत आहेत. सोहम यांनी हटके पोज देऊन हे पोस्टर शूट केलंय. पोस्टर पाहून 'तुंबाड'नंतर सोहम शाह यांच्या नव्या सिनेमाची कथा काय असणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे.
कधी रिलीज होणार Crazxy?
सोहम शाह निर्मित गिरीश कोहली दिग्दर्शित Crazxy सिनेमाची रिलीज डेटही आज जाहीर करण्यात आली. हा सिनेमा २८ फेब्रुवारी २०२५ ला रिलीज होणार आहे. सोहम शाह यांची सिनेमात प्रमुख भूमिका असून त्यांच्यासोबत कोणते कलाकार दिसणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. काहीच महिन्यांपूर्वी सोहम शाह यांनी 'तुंबाड २'ची सुद्धा घोषणा केली. त्यामुळे सोहम शाह नव्या सिनेमातून 'तुंबाड'सारखाच कोणता नवीन प्रयोग करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.