'क्रॅक' चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज, 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 05:16 PM2023-12-19T17:16:40+5:302023-12-19T17:20:30+5:30

विद्युत जामवालच्या 'क्रॅक' सिनेमाचा चित्तथरारक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

'Crakk': Teaser Unveils Vidyut Jammwal, Nora Fatehi Arjun Rampal | 'क्रॅक' चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज, 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

'क्रॅक' चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज, 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

बॉलिवूडचा कमांडो अशी ओळख असणारा अभिनेता म्हणजे विद्युत जामवाल.विद्युत जामवाल त्याच्या चित्रपटांमध्ये सगळे धोकादायक स्टंट स्वत: शूट करत असतो. विद्युत अ‍ॅक्शन चित्रपट जास्त करत असला तरी त्याचे चाहतेही त्याला तसे पसंत करतात. असाच चित्तथरारक स्टंट असलेला एक सिनेमातून विद्युत जामवाल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

 विद्युत जामवालच्या 'क्रॅक' सिनेमाचा चित्तथरारक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या सिनेमात विद्युत जामवाल पुन्हा एकदा दमदार अ‍ॅक्शन करताना दिसत आहे.  "जिंदगी तो साला सब के साथ खेलती है... लेकिन असली प्लेयर तो वही है जो जिंदगी के साथ खेले" हा डायलॉग क्रॅक चित्रपटाच्या टीझरमध्ये ऐकू येतो. 

1 मिनिट 25 सेकंदाच्या या टीझरमध्ये विद्युत जामवालसोबत सिनेमात नोरा फतेही, अर्जुन रामपाल यांचीही खास झलक पाहायला मिळत आहे. आदित्य दत्त दिग्दर्शित  'क्रॅक' 23 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. विद्युत जामवाल, अब्बास सय्यद आणि प्रांजल खंडाडिया यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विद्युत जामवाल या चित्रपटाचा सहनिर्माता देखील आहे. विद्युत जामवाल यांनी 19 एप्रिल 2021 रोजी 'Action Hero Films' नावाने त्यांचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले.  

Web Title: 'Crakk': Teaser Unveils Vidyut Jammwal, Nora Fatehi Arjun Rampal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.